राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
२०२८/२९ या वर्षात राहुरी महाविद्यालयास ५० वर्ष पूर्ण होत आहे. तत्पूर्वी महाविद्यालयास आद्ययावत इमारत बांधण्यात येणार असल्याचे डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी सांगितले. तसेच आगामी शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात विविध नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्यात एम.सी.एस. (MCS) हा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली.
लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय येथे शिवजयंती महोत्सव आणि ‘आरंभ’ युवा महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दि. २३ फेब्रुवारीपासून महाविद्यालयात सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांचा उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. या निमित्त गुणवंत व स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या सर्व संचालक मंडळांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण तनपुरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की “महाविद्यालयातील शिक्षण हे केवळ पदवी देणारे नसून संस्कार घडवणारे असते. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि आयुष्य हे शिक्षणावर अवलंबून असते.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात उच्च पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आजच्या स्पर्धात्मक व धकाधकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगल्या आरोग्याची गरज अधोरेखित करत त्यांनी खेळासाठी सुसज्ज मैदान तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली.
गेल्या १५ वर्षांपासून महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण वगळता इतर कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हते सदर कार्यक्रम पूर्ववत सुरु करावे अशी मागणी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी संस्थेचे सचिव हर्षदादा तनपुरे यांचेकडे केली होती. त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन हर्ष तनपुरे यांनी बंद पडलेली प्रथा पूर्ववत सुरु केल्या बद्दल महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीनी संस्थेचे अध्यक्ष व सचिव हर्ष तनपुरे आभार मानले.
महाविद्यालयातील सहाय्यक ग्रंथपाल जगन्नाथ इंगळे हे महाविद्यालयाचे सेवेतून ऑक्टोबर २०२६ मध्ये सेवा निवृत्त होत असून त्या प्रित्यर्थ त्यांनी महाविद्यालयास ५१ हजाराचा धनादेश यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण तनपुरे व सचिव हर्ष तनपुरे यांचेकडे सुपूर्त केला. तसेच जगन्नाथ इंगळे यांनी ग्रंथालयात ४५ हजाराची सुसज्य कॅबिन तसेच महाविद्यालय परिसरातील वृक्षाना पाणी देण्यासाठी ३५ हजार रुपयाचे ड्रीप बसवून दिले त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे वतीने सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक प्राचार्या डॉ अनिता वेताळ अंत्रे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी संचालक हर्ष तनपुरे, संचालक रावसाहेब चाचा तनपुरे, किसनराव जवरे, भास्कर ढोकणे, अरुण ढूस, प्रमोद तारडे, सुनील मोरे, अरुण ठोकळे, अशोक उऱ्हे जनार्धन (गणेश )गाडे, कृष्णा मुसमाडे, भारत वारुळे, ज्ञानेश्वर खुळे, प्रकाश भुजाडी, ज्ञानेश्वर पवार, अशोक तमनर, संचालिका वैशाली तारडे, सपना भुजाडी, मीना करपे, जनाबाई सोनवणे, सुरेश करपे, सुरेश निमसे, नगरसेवक डॉ. संतोष उदावंत, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र गोसावी, उप प्राचार्या मंजाबापू उऱ्हे, अधीक्षक गणेश देशमुख, आदि सह प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्या डॉ. अनिता वेताळ अंत्रे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप इरुळे, तर आभार डॉ. रंगनाथ खिलारी यांनी मानले.
