Type Here to Get Search Results !

राहुरी - राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन अनेकांचा मनसेत प्रवेश

 राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन अनेकांचा मनसेत प्रवेश.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन आज दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वराज्य शक्ती सेना तालुकाध्यक्ष प्रतिभाताई जाधव व तालुका उपाध्यक्ष पदी सचिन शिंदे यांनी जाहीर प्रवेश केला.


या सोहळ्या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, मनसे महिला सेना जिल्हा अध्यक्षा ॲड. अनिता दिघे, नगर शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, मनसे राहुरी शहराध्यक्ष प्रतीक विधाते, तालूका उपाध्यक्ष राहुल पिले तसेच असंख्य मनसे सैनिक उपस्थित होते.


पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळात पोहोचवण्याचा निर्धार.

यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी मनसेची मराठी अस्मिता, स्थानिकांना रोजगार, सुशासन आणि विकासाभिमुख भूमिका ही ध्येय-धोरणे तळागाळातील सर्व सामान्य नागरिकां पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. गावागावांत बैठका, जनसंवाद, युवक मेळावे आणि महिलांसाठी विशेष उपक्रम राबवून संघटना अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला.


संघटनात्मक बळकटी आणि आगामी वाटचाल

उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, या प्रवेशामुळे तालुक्यात मनसेची संघटनात्मक ताकद वाढणार असून स्थानिक प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे आवाज उठवता येईल. रस्ते, पाणी, वीज, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी यांसारख्या विषयांवर ठोस भूमिका घेऊन जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध राहील.


राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या जाहीर प्रवेशामुळे तालुक्यात राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात मनसे अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.