Type Here to Get Search Results !

पारनेर - पारनेर तालुक्यातील महाआरोग्य शिबिरासाठी जागृती कार्यक्रम

 पारनेर तालुक्यातील  महाआरोग्य शिबिरासाठी जागृती कार्यक्रम

टाकळी ढोकेश्वर येथे महाआरोग्य शिबिरासाठी जागृती कार्यक्रम

लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला ६० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन ८ आणि ९ मार्च रोजी करण्यात येत आहे.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्य जागृती निर्माण करण्यासाठी टाकळी ढोकेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेत विशेष जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना महाआरोग्य शिबिराबाबत माहिती असलेले पत्रक वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला खाऊ वाटप करून शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान देण्यात आले.

कार्यक्रमाला टाकळी ढोकेश्वर गटाचे प्रमुख नेते रविंद्र राजदेव, राष्ट्रवादीचे प्रवक्ते मोहनराव रोकडे, तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष मळीभाऊ रांधवण, विक्रम झावरे, विलास ठुबे, नांदूर पठारचे माननीय सरपंच भानुदास आग्रे, जनार्दन चौधरी, रविंद्र चौधरी, रामदास राजदेव, प्रणव पानसरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित नेत्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व आणि शिबिरात उपलब्ध होणाऱ्या मोफत वैद्यकीय तपासणी, औषधे व उपचार याबाबत मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असून, स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व स्तरांतून सहभाग वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.