Type Here to Get Search Results !

राहुरी - भामट्यांनी २३ हजार ३३० रुपयांचे रुपयांचे डिझेल चोरून नेले

 भामट्यांनी २३ हजार ३३० रुपयांचे रुपयांचे डिझेल चोरून नेले.



पेट्रोल पंपा जवळ उभ्या असलेल्या ट्रकमधील २५९ ली. डिझेल पहाटेच्या वेळी चोरुन नेले.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


चार चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात तीन भामट्यांनी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील एका पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीमधून सुमारे २३ हजार ३३० रुपयांचे २५९ लीटर डिझेल चोरून नेल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. 


संतोष निवृत्ती पागिरे, वय ५१ वर्षे, हे माजी सैनिक असून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे राहत आहेत. त्यांचा लहान भाऊ दिलीप निवृत्ती पागिरे यांच्याकडे टाटा कंपनीचा मालवाहतुक ट्रक आहे. दिलीप पागिरे यांनी त्यांचा मालट्रक हा कांतीलाल शांतीलाल अ‍ॅण्ड सन्स मुनोत भारत पेट्रोलियम वांबोरी येथे पेट्रोल पंपा जवळ लावला होता.


दि. १९ मार्च २०२६ रोजी पहाटे १ वाजे दरम्यान अज्ञात तीन भामटे चारचाकी वाहनातून आले. त्यांनी पागीरे यांच्या मालट्रकच्या डिझेल टाकचे झाकण तोडुन त्यामधील २३ हजार ३३० रुपयांचे २५९ लीटर डिझेल चोरून नेले. सदर घटना ही पेट्रोल पंपावरील सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाली. 


संतोष निवृत्ती पागिरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन भामट्यांवर गुन्हा रजि. नं. २५२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास राहुरी पोलीस पथकाकडून सुरु आहे.