Type Here to Get Search Results !

राहुरी - उचल दिलेले पैसे परत मागितल्याने दोघां जणांना मारहाण

 उचल दिलेले पैसे परत मागितल्याने दोघां जणांना मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


ऊस तोडीचे कामासाठी उचल दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने आरोपींनी दोघां जणांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच दगड मारून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सडे येथे दि. १८ मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडली. 


अब्दुल ईसाकभाई पठाण, वय ४४ वर्षे, रा. महादेववाडी, सडे, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १८ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजण्याचे सुमारास अब्दुल पठाण व त्यांचा मित्र नितीन रामभाउ सगळगिळे हे दोघे सडे शिवारातील महादेववाडी गावचे चौकात असतांना त्यांनी आरोपीला ऊस तोडीचे कामासाठी उचल दिलेले पैसे परत मागितले. त्याचा राग आल्याने आरोपीने नितीन सगळगिळे व अब्दुल पठाण या दोघांना शिवीगाळ करून हाताच्या चापटांनी मारहाण केली. तसेच दगड मारून जखमी केले.


अब्दुल ईसाकभाई पठाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी आसीफ चॉदभाई पठाण व दिलदार चाँदभाई पठाण, दोन्ही रा. महादेववाडी, सडे, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. २४३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.