पैशाची मागणी केली असता मोहन कदम यांना बेदम मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे पैशाच्या वादातून आचार्याला मारहाण झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे घडली असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहन गंगाराम कदम, वय ४७ वर्षे, रा. डिग्रस, ता. राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, मोहन कदम हे पत्नी छाया यांच्यासह आचारी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
दि. १७ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आरोपी विशाल गाडे हा कदम यांच्या घरी गेला व पूर्वी कामावर असताना दिलेल्या पैशांची मागणी केली. त्यावेळी कदम यांनी सध्या पैसे नसून दुसर्या दिवशी देण्याचे सांगितले. त्यावेळी संतप्त झालेल्या विशाल गाडे याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर काही वेळाने विशाल गाडे हा लोखंडी गज घेऊन पुन्हा आला व त्याच्या सोबत आकाश गाडे हाही होता. त्यावेळी कदम हे घराच्या अंगणात उभे असताना विशाल गाडे याने लाथा बुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी गजाने मारहाण केली. तसेच आकाश गाडे याने शिवीगाळ करून दमदाटी केली.
या प्रकरणी मोहन गंगाराम कदम यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल सुनिल गाडे व आकाश लहू गाडे, दोन्ही रा. डिग्रस, ता. राहुरी, यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २४०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), ११८ (१), ३ (५), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
