Type Here to Get Search Results !

पुणे - राधेश्वरीनगर येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव भक्तिभावात संपन्न

 राधेश्वरीनगर येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव भक्तिभावात संपन्न




पुणे प्रतिनिधी:राधेश्वरीनगर येथील श्रीगुरुदेव दत्त मंदिरात भगवान दत्तात्रेयांचा तृतीय अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

          या निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. सकाळपासून अभिषेक, भूपाळी आरती, हवन, स्वामी समर्थ सारामृत पठण, नैवेद्य आरती, हरिपाठ व भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पालखी सोहळ्यात “श्री स्वामी समर्थ” नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे श्रीरूप या बालकाने साकारलेले बालस्वरूपातील स्वामी समर्थ दर्शन होय. त्यामुळे पालखी सोहळ्यात अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घेतला. काही भाविकांनी कार्यालयीन व्यस्ततेनंतरही उशिरापर्यंत मंदिरात उपस्थित राहून श्रद्धा व्यक्त केली.

            कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सेवेकऱ्यांनी मांदियाळी स्वरूपात बनवून आणलेल्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. हा उत्सव केवळ धार्मिक न राहता संस्कार, एकात्मता व स्वामीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठरला.

             या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.