Type Here to Get Search Results !

राहुरी - वृषाली गाढे व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ, लाकडी दांड्याने मारहाण.


 


वृषाली गाढे व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ, लाकडी दांड्याने मारहाण. 


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


माझ्यावर केलेली केस मागे घ्या, नाहीतर मी एक एकाला जिवंत सोडणार नाही. असे म्हणुन आरोपींनी वृषाली गाढे व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कणगर येथे दि. २९ मार्च रोजी सकाळी घडली. 


वृषाली रमेश गाढे, वय ४५ वर्षे, रा. कणगर, ता. राहुरी, हल्ली रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, वृषाली गाढे यांच्या सासुच्या नावे कणगर येथे एक एकर जमीन होती. सासू दोन वर्षापुर्वी मयत झाली आहे. 


वृषाली गाढे यांचे दीर राजेंद्र गाढे हे त्यांना नेहमी घरी येवुन सासुच्या नावे असलेली जमीन माझे नावे करून द्या, असे म्हणुन वाद घालत असतात. त्या वादातुन वृषाली गाढे यांच्या पतीने दीर राजेंद्र गाढे याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे.


दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास वृषाली गाढे ह्या घरी असताना आरोपी तेथे गेले व मला म्हणाले की, माझ्यावर केलेली केस मागे घ्या, नाहीतर मी एक एकाला जिवंत सोडणार नाही. असे म्हणुन आरोपींनी वृषाली गाढे यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच त्यांचे पती व मुलांना शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण केली. 


आणि वैशाली गाढे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठन बळजबरीने ओढून तोडून नेले. तसेच तुम्ही जर केस मागे घेतली नाहीतर मी तुम्हाला एक एकाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.


वृषाली रमेश गाढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र परसराम गाढे व वैशाली राजेंद्र गाढे, दोघे रा. कणगर, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. २८७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११९ (१), ११८ (१), ११७ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.