कल्याणी गाढे व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे बाजार सुरु असताना आरोपींनी कल्याणी गाढे व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन काठी, लोखंडी गज व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. २९ मार्च रोजी सकाळच्या दरम्यान घडली.
कल्याणी राजेंद्र गाढे, वय ३० वर्षे, रा. कनगर, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कल्याणी गाढे यांचे दोन्ही मुले भाजी विक्री करणेसाठी राहुरी फॅक्टरी भाजीमंडई येथे गेले होते. तेव्हा त्यांच्या मुलाचा फोन आल्याने कल्याणी गाढे व त्यांचे पती राहुरी फॅक्टरी भाजी मंडईत गेले.
तेव्हा आरोपींनी कल्याणी गाढे तसेच त्यांचे पती व मुलांना शिवीगाळ करुन लाकडी काठी, लोखंडी गज व लाथा बूक्क्यांने मारहाण केली. तसेच आरोपींनी कल्याणी गाढे यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण तोडुन नेले. घटनेनंतर कल्याणी राजेंद्र गाढे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्या फिर्यादीवरून आरोपी वृशाली रमेश गाढे, रमेश परसराम गाढे, सार्थक रमेश गाढे, शुभम रमेश गाढे, सर्व रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, तसेच दिनकर भास्कर कर्पे, रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. २८४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११९ (१), ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, १८९ (२), १८९ (४), १९१ (१), १९१ (३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
