मेडिकव्हर हॉस्पिटल्स, पुणे येथे ८५० ग्रॅम वजनाच्या अतिदुर्मिळ प्रीमॅच्युअर नवजात बाळाला यशस्वी जीवनदान
पुणे प्रतिनिधी : Medicover Hospitals, पुणे येथे अत्याधुनिक नवजात अतिदक्षता विभागाच्या (एनआयसीयू) मदतीने अतिशय कमी वजनाच्या आणि अत्यंत गंभीर स्थितीत जन्मलेल्या नवजात बालिकेला यशस्वीरित्या डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ही बालिका केवळ २६ आठवडे ४ दिवसांच्या गर्भावस्थेत जन्माला आली होती आणि तिचे जन्मावेळी वजन फक्त ८५० ग्रॅम होते. तिला ९ जानेवारी २०२६ रोजी एनआयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. ही प्रसूती श्रीमती मंगला भांगे (वय ४३ वर्षे) यांची होती. त्यांना यापूर्वी अनेक आयव्हीएफ अपयश, खराब प्रसूती इतिहास (बीओएच), उच्च रक्तदाब, गर्भावस्थेतील मधुमेह (जीडीएम), हायपोथायरॉईडिझम आणि सर्व्हिकल इनकॉम्पिटन्स यांसारख्या गुंतागुंती होत्या. गर्भावस्थेदरम्यान प्री-एक्लेम्पसिया झाल्याने हा अतिजोखमीचा केस होता. ही प्रसूती Dr. Madhushree Mane आणि Dr. Sharyu यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
प्रसूतीनंतर या नवजात बालिकेची जबाबदारी Dr. Dattatray Kulkarni, निओनॅटोलॉजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल्स यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली एनआयसीयू टीमने या गुंतागुंतीच्या केसचे यशस्वी व्यवस्थापन केले.
एनआयसीयू मध्ये सुमारे दोन महिन्यांच्या उपचारादरम्यान बालिकेवर खालील गंभीर समस्या यशस्वीरित्या हाताळण्यात आल्या:
• रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (आरडीएस) : सर्फॅक्टंट, एनआयव्ही, सीपॅप आणि २६ दिवस ऑक्सिजनची आवश्यकता
• सबगेलियल ब्लीड : फ्लुइड्स व इनोट्रोप्सद्वारे उपचार
• अॅसिनेटोबॅक्टर सेप्सिस : प्रभावी उपचार
• हेमोडायनामिकली सिग्निफिकंट पीडीए (एचएसपीडीए)
• एपनिया ऑफ प्रीमॅच्युरिटी (एओपी)
• ऑस्टिओपेनिया ऑफ प्रीमॅच्युरिटी (ओओपी)
• पोषण व्यवस्थापन : आईच्या दुधावर आधारित आहार
उपचारानंतर आता ही बालिका ३५ आठवडे २ दिवसांच्या करेक्टेड गर्भावस्थेपर्यंत पोहोचली असून तिचे डिस्चार्जवेळी वजन १८२५ ग्रॅम झाले आहे. डिस्चार्जपूर्व तपासण्यांमध्ये ग्रेड १ पीव्हीएल, झोन ३ आरओपी (निरीक्षणाखाली) आणि ईको अहवाल सामान्य असल्याचे दिसून आले असून बाळाची प्रकृती स्थिर आहे.
