यात्रेमध्ये फिरत असताना महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे मंगळसुत्र पळवीले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
अहिल्यानगर येथील वर्षा उंडे ह्या राहुरी येथील श्री खंडेराय यात्रेत फिरत असताना त्यांच्या गळ्यातील मनी मंगळसुत्र अज्ञात भामट्याने चोरुन नेले. ही घटना दि. ५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
वर्षा सागर उंडे, वय ३२ वर्षे, रा. रोहकले गल्ली, नालेगाव, अहिल्यानगर, मुळ रा.राहुरी बु, ता. राहुरी. ह्या दि. ५ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान राहुरी येथील श्री खंडेराय यात्रेत फिरत असताना खंडोबा मंदिराच्या समोरच त्यांच्या गळ्यातील मनी मंगळसुत्राचा अर्धा भाग तुटुलेला त्यांना दिसला.
तेव्हा त्यांनी बाकी मंगळसुत्राचा परिसरात शोध घेतला. मात्र ते मिळुन आले नाही. तेव्हा त्यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेवुन त्यांच्या गळ्यातील मनी मंगळसुत्राचा अर्धा भाग म्हणजे अर्धा तोळा मनी मंगळसुत्र चोरुन नेले.
वर्षा सागर उंडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ३२२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
