श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेला ४ कोटी ०३ लाख रुपयांचा नफा
श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेला ४ कोटी ०३ लाख रुपयांचा नफा
श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेला दि.३१ मार्च २०२६ अखेर ४ कोटी ०३ लाख रुपयांचा नफा झाला असून संस्थेच्या ठेवीमध्ये ११ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री.बा.ठ. झावरे यांनी दिली.लवकरच संस्था १५० कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेच्या ८शाखांच्या माध्यमातून व १५ वर्षाच्या वाटचालीमध्ये सभासदांना अत्याधुनिक बँकिंग सुविधा तसेच विविध प्रकारच्या ग्राहकभिमुख योजनांच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न संस्थेने केलेला आहे. ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात संस्थेकडे १४३ कोटी रुपयांच्या ठेवी असून कर्ज वाटप ११९ कोटी रुपये इतके आहे.संस्थेने विविध बँकांमध्ये ४५ कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केलेली आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय २६२ कोटी रुपये इतका झालेला आहे. राखीव व इतर निधी ११ कोटी ७५ लाख रुपये आहे. संस्थेला थकबाकीचे प्रमाण अत्यल्प राखण्यास यश आलेले आहे.संस्थेने १५ वर्षे सातत्याने नफा मिळवताना ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झालेला आहे. संस्थेने नवीन व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे संस्थेची प्रगतीची घौडदौड चालु आहे. खातेदारांना संस्थेच्या कोणत्याही शाखेतून रक्कम काढता यावी यासाठी संस्थेने कोअर बँकिंग प्रणालीचा स्वीकार केला आहे. संचालक मंडळाने नेहमीच सभासदांचे हित जपण्याचा प्रयत्न केलेला असून सर्व ग्राहकांनी व सभासदांनी संस्थेप्रती दाखविलेल्या विश्वासास कधीही तडा जाऊ न देता सर्व संचालक मंडळ,ठेवीदार,कर्जदार,सर्वसामान्य ग्राहक,हितचिंतक व कर्मचारी वर्ग यांच्या पाठबळावर संस्था प्रगतीपथावर नेण्याचा प्रामाणिक व विश्वासास पात्र राहूनच प्रयत्न भविष्यकाळातही करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे यांनी सांगितले.
