Type Here to Get Search Results !

राहुरी - मुलीला भेटायला गेलेल्या वडिलांना सासूरवाडीच्या लोकांनी बेदम मारहाण.


 


मुलीला भेटायला गेलेल्या वडिलांना सासूरवाडीच्या लोकांनी बेदम मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


मुलीला भेटायला गेलेल्या वडिलांना सासूरवाडीच्या लोकांनी लोखंडी रॉड, लोखंडी पाईप व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना दि. २६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. 


विशाल रावसाहेब लांडगे, वय ३० वर्षे, धंदा- नोकरी (भारतीय सेना), रा. देहरे, ता. नगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, विशाल लांडगे यांचे लग्न २०२० मध्ये राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील गोविंद पठारे यांची मुलगी मनिषा हिच्याशी झाले होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. ती सध्या चार वर्षाची आहे. पत्नी मनिषा हिने तिच्या वडीलांना पैसे देत का नाही या कारणावरुन वाद झाल्याने सन २०२५ मध्ये आत्महत्या केली आहे. तेव्हा पासुन मुलगी लांडगे यांची सासुरवाडी देवळाली प्रवरा येथे राहते.


मुलीचा हात मोडला आहे, असे समजल्यावर विशाल लांडगे हे दि. २६ मार्च २०२६ रोजी रात्री ११.३० वाजे दरम्यान देवळाली प्रवरा येथे त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा सासूरवाडीच्या लोकांनी त्यांना लोखंडी रॉड, लोखंडी पाईप व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील २० हजार रुपए रोख रक्कम असलेले पाकीट आरोपींनी काढून घेतले. 


त्यानंतर आरोपींनी घरातुन लिंबू, हळद कुंकु आणुन घराच्या दरवाजा समोर ठेवले व विशाल लांडगे यांची मोटरसायकल अंगणात लावुन तिच्या बाजुला कुऱ्हाड, गलोल, लिंबु, टाचण्या आणुन ठेवल्या.


या घटनेत विशाल रावसाहेब लांडगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी पोलिसां समक्ष दिलेल्या जबाबावरून आरोपी गोविंद गंगाधर पठारे, जालींदर गंगाधर पठारे, पवन गोविंद पठारे, चेतन जालींदर पठारे यांच्यावर गुन्हा रजि. नं. २९०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११९ (१), ११८ (१), १२६ (२), ११५ (१), ३५१ (३), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.