८५ फुट उंचीच्या काठीची सवाद्य भव्य मिरवणूक.
भंडाऱ्याची उधळण करीत मळगंगा देवीच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला.
पारनेर / प्रतिनिधी
८५ फुट उंचीच्या सजवलेल्या काठीची गुरुवार दि.२ एप्रिल रोजी दुपारी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भावीकांनी भंडाऱ्यांची उधळण करीत मळगंगा देवीच्या जयजयकाराच्या घोषना देत आनंद साजरा केला. दुपारी एक वाजता पाऊसाचे वातावरण तयार झाले होते. ढगांचा कडकडाट सुरू झाला होता. पाऊस येतो की काय अशी शक्यता निर्माण झाल्याने काठीची मिरवणूक नेहमीपेक्षा एक तास आधीच काढण्यात आली. मात्र थोडाफार पाऊस अधूनमधून सुरुच होता. असे असूनही काठी मिरवणूकीला भावीकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. देवीला हळद लावणे, काठीची मिरवणूक या नंतर शुक्रवार दि.१० रोजी मुख्य यात्रा सुरु होत असून ही यात्रा तीन दिवस सुरू असते. राज्यातून लाखो भाविक या यात्रेसाठी येत असतात. रोज सकाळी सहा वाजता तसेच सायंकाळी सात वाजता देवीची महाआरती होत असते. सायंकाळी होणाऱ्या महाआरतीला भावीक मोठ्या संख्येने गर्दी करतात. देवीचे पुजारी गायखे कुटुंब शेकडो वर्षांपासून देवीचे पुजारी म्हणून काम पाहतात तसेच आरतीला संबळ वाजवण्याचा व आरतीचा मान दुणगुले कुटुंबाला आहे. देवीची हेमांडपंथी बारव ते मळगंगा मंदीरात पर्यंत ही काठी नेण्यासाठी भावीक संख्येने उपस्थित असतात यामध्ये काठी उचलण्याचे कसब पणाला लावून काठी उचलतात चारही बाजूनी दोराच्या सहाय्याने काठीचा तोल सांभाळून घेऊनच मिरवणूक काढली जाते. यामध्ये वजनदार काठी व उंची ८५ फूट या काठीची मिरवणूक ही देवीचा एक साक्षात्कार आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून देवीचा राज्यात नावलौकिक असून तीन दिवसांच्या यात्रेची तयारीसाठी ग्रामस्थ पंधरा दिवस परिश्रम घेतात.
फोटो ओळी -
मळगंगा देवीच्या ८५ फूट उंचीच्या काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
