शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव २०२६ समितीची नियोजन बैठक संपन्न...
श्रीगोंदा, दि. २३ एप्रिल – श्रीगोंदा शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव २०२६ निमित्त पंचायत समिती, श्रीगोंदा येथे जयंती उत्सव समितीची नियोजन बैठक पार पडली.
बैठकीत केवळ महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून बैठक नियोजित वेळेत संपन्न करण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेतील विषय व निर्णय सर्व सदस्य व संघटनांपर्यंत पोहोचवण्यासाठी वैयक्तिक भेट, दूरध्वनीद्वारे संपर्क तसेच ग्रुपवर संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी जयंती उत्सव दिनांक १४ व १५ मे २०२६ रोजी दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज प्रतिमापूजन, मॅरेथॉन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शंभू गौरव गीते, बुधभूषण ग्रंथ पारायण, शंभूप्रसाद, संगीत खुर्ची स्पर्धा, मान्यवर सन्मान तसेच शंभू चरित्र शाहीर कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
बैठकीचे नियोजन संभाजी ब्रिगेड पार्टीचे तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे यांनी केले. बैठकीसाठी उपाध्यक्ष दिलीप लबडे, संपर्क प्रमुख बापु जगताप, सचिव सुयोग धस तसेच कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष घनशाम काळे उपस्थित होते. तसेच शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन झगडे सर, सामाजिक कार्यकर्ते परीस जाधव, हंबीरराव भोस, सद्दाम शेख, उद्योजक बालू दादा मखरे, यशवंत पोटे, संदीपजी उमाप, सागर शिंदे, मखरे सर, विकास होले, दिपक टकले, अमोल कोकाटे, दत्ता दिवटे, युवा नेते आदित्य लोखंडे व डॉ. अरुण ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी संभाजी महाराज जयंती उत्सवात सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगितले.
सर्व नागरिकांनी जयंती उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
