Type Here to Get Search Results !

राहुरी - यशवंत संघर्ष सेना व सकल धनगर समाजाचा राहुरी पोट निवडणुकीत कर्डीले यांना जाहीर पाठींबा

 यशवंत संघर्ष सेना व सकल धनगर समाजाचा राहुरी पोट निवडणुकीत कर्डीले यांना जाहीर पाठींबा 





राहुरी विधानसभा (२२३) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या प्रचाराला मोठी ताकद मिळाली आहे. यशवंत संघर्ष सेना तसेच सकल धनगर समाजाच्या वतीने कर्डीले यांना जाहीर पाठींबा देण्यात आल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले की, राहुरी-नगर-पाथर्डी या विस्तृत भागाचे सक्षम नेतृत्व करण्याची क्षमता अक्षय कर्डीले यांच्यात असून, त्यांच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. समाजाच्या विकासासाठी, न्याय हक्कांसाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कर्डीले हे योग्य नेतृत्व ठरतील, असे मत यावेळी मांडण्यात आले. यशवंत संघर्ष सेना व सकल धनगर समाजाच्या या ठाम भूमिकेमुळे कर्डीले यांच्या प्रचाराला अधिक धार आली असून, गावागावांतून त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः धनगर समाजाचा मोठा पाठिंबा मिळाल्याने निवडणुकीत कर्डीले यांची बाजू अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, या जाहीर पाठींब्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात प्रचाराची गती आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विश्वास, विकास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर भर देत कर्डीले यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.