Type Here to Get Search Results !

पारनेर - बेल्हे येथील ताशा सम्राट इस्माईल फकीरभाई बेपारी बेल्हेकर यांचा रवींद्र राजदेव यांच्या हस्ते सत्कार

 बेल्हे येथील ताशा सम्राट इस्माईल फकीरभाई बेपारी बेल्हेकर यांचा रवींद्र राजदेव यांच्या हस्ते सत्कार

पारनेर / प्रतिनिधी



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष श्री. रवींद्र राजदेव यांच्या हस्ते बेल्हे येथील प्रसिद्ध ताशा सम्राट इस्माईल भाई बेपारी यांचा सत्कार करण्यात आला.

इस्माईल भाई बेपारी हे बऱ्याच वर्षांपासून शारीरिक बाधेमुळे आठ ते दहा वर्षापासून कोणत्याही ताफ्यात ताशा वाजवताना दिसत नाहीत. मात्र त्यांच्या कलेचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे. जुना इतिहास पाहिला तर त्यांच्या सारखा ताशा सम्राट पुन्हा होणे कठीण आहे, असे जाणकार सांगतात. त्यांनी ज्या ताशा कलेला जोपासले आणि उंचीवर नेले, ती कला आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक युवा ताशा वादक तयार झाले आणि त्यांनीही राज्यभर आपला ठसा उमटवला आहे.

शारीरिक अडचणी असूनही कलेच्या क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल रवींद्र राजदेव यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन इस्माईल भाई बेपारी यांचा सत्कार केला. यावेळी त्यांना भेटवस्तू देऊन मान्यवरांनी आदर व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मोहन रोकडे, गाडी घुंगराची फेम गायक विलास अटक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

रवींद्र राजदेव यांनी म्हटले की, “इस्माईल भाईंनी ताशा कलेला दिलेले योगदान अमर आहे. त्यांच्या कलेने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. अशा कलावंतांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.”

हा सत्कार  कलाक्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांच्या योगदानाची आठवण करून देणारा ठरला. उपस्थितांनी इस्माईल भाई बेपारी यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.