Type Here to Get Search Results !

पारनेर - वडगाव सावताळ येथील प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 वडगाव सावताळ येथील प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



पारनेर / प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत एनएसई ओलंपियाड, लक्षवेध, मंथन, मिशन आरोप व प्रज्ञाशोध या विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष श्री. रवींद्र राजदेव यांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला परीक्षेमध्ये यशस्वी असणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसाठी रवींद्र राजदेव यांच्या माध्यमातून खाऊचे वाटपही या ठिकाणी करण्यात आले या परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विराज बाबासाहेब साकोरे (इयत्ता पहिली), अरविंद ज्ञानेश्वर हार्दिक (इयत्ता चौथी), पूर्व बाबासाहेब साकोरे (इयत्ता चौथी) आणि दर्शनी संदीप खंडागळे (इयत्ता तिसरी) यांचा विशेष गौरव करण्यात आला.

श्री. रवींद्र राजदेव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, “लहान वयातच असे उत्कृष्ट यश मिळवणे हे तुमच्या मेहनत, बुद्धिमत्ता आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फळ आहे. भविष्यातही सातत्याने प्रयत्न करत राहा, तुमचे उज्ज्वल भवितव्य निश्चित आहे.” त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मोहन रोकडे, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पोटे सर, बाळू जाधव सर, सोपान राऊत सर, श्रीमती तराळ मॅडम, श्रीमती लोखंडे चूर मॅडम, श्रीमती दातीर मॅडम, श्री. हारदे सर, पायमोडे सर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.