श्री पद्ममनी जैन इंग्लिश स्कुल ची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम*
तनिषा सिनलकर ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम
पाबळ प्रतिनिधी सुनिल पिंगळे
श्री पद्ममनी जैन श्र्वेतांबर तीर्थ पेढी संचलित श्री पद्ममनी जैन इंग्लिश स्कूलचा एसएससी परीक्षेचा निकाल सलग १४ वर्षी १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी १००% निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती मुख्याध्यापिका सुरेखा वाईकर यांनी दिली. चालु 2026 या शैक्षणिक कालवधीमध्ये तनिषा शिनलकर ९७.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला आहे तर श्रेया खैरे ८९.२०,साक्षी खरपुडे ८९.२०जोया गोलंदाज ८९.२० यांनी द्वितीय क्रमांक व आरुषी गायकवाड ८६.८० गुण मिळवून तृतीय क्रमांक, तर आदिती दौंडकर ८६.४० चतुर्थ तर श्रेयस लोखंडे ८३.२० याने पाचवा क्रमांक मिळवला आहे
गेले 14वर्षाची पंरपरा यावर्षी विद्यार्थ्यांना कायम ठेवता नवीन इतिहास प्रस्थापित केला आहे तर यावर्षी मुलीनी बाजी मारत शाळेच्या नाव उंचवण्यासाठी प्रयत्न केला आहे अत्यंत प्रतिकुल परिस्थिती शिक्षण घेता असताना प्राध्यापक यांच्या सहकार्याने यशाला गवसणी घेतलेले तनिषा शिनलकर या विद्यार्थींनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं की अभ्यासातील सातत्य,शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि माझ्या आईवडिलाचा पाठीशी असलेले हात हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षद गांधी,सचिव सुनील राठोड,सदस्य केतन शहा,जयेश शहा,गिरीश शहा,भूषण गांधी व संचालक मंडळ,शिक्षक पालक संघ तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे शाल श्रीफळ देऊन पुढिल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा आणि
अभिनंदन केले आहे

