Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवांकुर विद्यालयाची इ १० वी च्या १००% निकालाची परंपरा कायम


 



शिवांकुर विद्यालयाची इ १० वी च्या १००% निकालाची परंपरा कायम


शिवांकुर विद्यालयाचा परंपरेप्रमाणे इ १० वी चा मार्च २०२६चा निकाल 100% लागला. विद्यालयातील प्रथम ३ विद्यार्थी पुढीलप्रमाणे-

१) कु. श्रावणी संतोष सोडणर 91.40%

२) कु.गौरी किशोर तमनर 89.40%

३) कु.  अनुष्का प्रकाश औटी 88.40%

यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि पालक यांचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष गणेश शेळके, विश्वस्त मंगल पवार, डॉ नरेंद्र इंगळे, डॉ गौरी पवार, ज्योती शेळके, शिल्पा इंगळे व संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धूमाळ, सौरभ भांबळ प्रियंका पांढरे, ज्योती शेळके, अनिता म्हसे, मोहिनी पेरणे, सुरेखा मकासरे, सोनाली कुमावत, अनिता लांबे, सुजाता तारडे, सुनिता ढोकणे, दुर्गा बारवेकर, रोहिणी हापसे, लिपिक भाग्यश्री झांबरे, शिपाई शारदा तमनर आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचे नर्सरी, एलकेजी, यूकेजी, १ ली ते १० वी चे प्रवेश सुरू झाले आहेत तरी मर्यादित विद्यार्थी संख्या असल्याने पालकांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.