Type Here to Get Search Results !

राहुरी - मुलाला धमकी दिल्याचा जाब विचारला म्हणुन मारहाण वडिलांना कुऱ्हाड मारून जखमी केले

 वडील, आई व मुलाला शिवीगाळ करुन मारहाण.



*मुलाला धमकी दिल्याचा जाब विचारला म्हणुन मारहाण वडिलांना कुऱ्हाड मारून जखमी केले. 


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


मुलाला धमकी दिल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले वडील, आई व मुलाला आरोपींनी शिवीगाळ करुन कुऱ्हाड डोक्यात मारून जखमी केले. ही घटना दि. २८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. 


सविता शैलेश कहार, वय ४३ वर्षे, धंदा. शेती, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सविता कहार यांच्या शेजारी त्यांचा सावत्र भाया गणेश रामदास कहार हा त्याचे कुटूंबासह राहण्यास असुन दोघात शेतीमध्ये सामाईक विहीर आहे.


दि. २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सविता कहार यांचा मुलगा ओम व त्याचे मित्र सामाईक विहीरकडे पोहण्यासाठी जात असताना समर्थ गणेश कहार याने त्यांना तुम्ही जर विहीरीमध्ये पोहायला गेले तर तुमचे तंगडे तोडील अशी धमकी दिली होती. त्यानंतर ओम याने घडलेला प्रकार घरी आल्यानंतर सांगितला.


घडलेल्या प्रकारा बाबत जाब विचारण्यासाठी शैलेश कहार व मुलगा ओम हे गेले होते. या गोष्टीचा राग आल्याने आरोपींनी वडिल व मुलाला हाताने मारहाण करून वाईट वाईट शिवीगाळ केली. वडिलांना कुऱ्हाड मारून जखमी केले. भांडण सोडवीण्यासाठी सविता कहार ह्या गेल्या असता त्यांना देखील वाईट वाईट शिवीगाळ दमदाटी करून ढकलुन दिले. त्यानंतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.


घटने नंतर सविता शैलेश कहार यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश रामदास कहार, तुषार गणेश कहार, समर्थ गणेश कहार, सर्व रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजी. नं. ४५१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.