Type Here to Get Search Results !

राहुरी - पैशाच्या व्यवहारातून दोघा भावांना मारहाण - तुम्ही आमचे पैसे परत कधी देणार असे म्हणुन शिवीगाळ करत काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण




पैशाच्या व्यवहारातून दोघा भावांना मारहाण.


तुम्ही आमचे पैसे परत कधी देणार असे म्हणुन शिवीगाळ करत काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण. 


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तुम्ही आमचे पैसे परत कधी देणार असे म्हणुन आरोपींनी दोघां भावांना शिवीगाळ करुन काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दि. २ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. 


चांगदेव ज्ञानदेव ढोकणे, वय ४३ वर्षे, धंदा. शेती, रा. उंबरे, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याचे सुमारास चांगदेव ढोकणे व त्यांचा भाऊ बाबासाहेब जढोकणे असे दोघेजण उंबरे गावातील बस स्थानक जवळ असताना आरोपी त्यांना म्हणाले कि, तुम्ही आमचे पैसे परत कधी देणार आहे, असे म्हणून दमदाटी करण्यास सुरवात केली.


तेव्हा चांगदेव ढोकणे त्यांना म्हणाले की, मी तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत दिलेले आहेत. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी दोघा भावांना वाईट वाईट शिवीगाळ, दमदाटी करुन काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.


तसेच तू जर आमचे पैसे परत दिले नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी चांगदेव ढोकणे यांच्या खिशातील ३५ हजार रुपए रोख रक्कम काढून घेतली. असे फिर्यादीत म्हटले आहे. 


चांगदेव ज्ञानदेव ढोकणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आण्णासाहेब फकीरा ढोकणे, रोहित आण्णासाहेब ढोकणे, अमोल जालिंदर ढोकणे, पवन रामभाऊ ढोकणे, सर्व रा. उंबरे, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ४५४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ११९ (१), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.