श्रीगोंदा =बाबुराव बोत्रेपाटील यांचे नेतृत्वाखाली ओकांर शुगर ग्रुप च्या माध्यमातुन तीन राज्यातील बंद पडलेले अथवा अडचणीत सापडलेले 17 साखर कारखाने पुनर्जीवित केलेले आहेत आणि सुमारे 11 लाख ऊस उत्पादक शेतकरी कामगार ऊस तोडणी मजुर यांना आर्थिक न्याय दिला आहे. एक महिन्याचे ऊस देणे शेतकऱ्यांना राहिलेले आहे. शेतकरी व ऊस वाहतुकदार यांची बिल देण्यात येतील कुणाचा एक रुपयाही ठेवला जाणार नाही अशी माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी दिली.
ओमराजे बोत्रेपाटील यांनी दिलेल्या पत्रकात पुढे नमुद केले आहे की. महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक राज्यातील 17 साखर साखर कारखाने चालवून 75 लाख मे टन ऊसाचे गाळप केले आहे शेतकऱ्यांना 1 हजार 830 कोटीची उस बिल तर उस तोडणी मजुर वाहतुकदारांना 710 कोटीची बिल अदा करण्यात आली आहेत तसेच 18 हजार साखर कामगारांच्या चुली पुन्हा पेटविण्याचे काम केले आहे या गाळपात सहा हजार कोटीची उलाढाल झाली आहे. ग्रामीण भागील अर्थकारणाला आकार देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे..
येत्या हंगामात 21 साखर कारखाने चालवून 1 कोटी मे टन गाळप करून 7 हजार कोटीची उलाढाल करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार पेट्रोल डिझेल मध्ये 33 इथेनॉल मिसळण्यास परवानगी देण्यात येणार त्यामुळे ओंकार ने सर्व माॅलेसेस साठवून ठेवले यातून सुमारे 600 कोटी मिळणार आहेत.
राज्यातील 140 खाजगी अथवा सहकारी साखर कारखान्यांना एफ आर पी पोटी 2 हजार 100 कोटीची रक्कम शेतकऱ्यांना देणे आहे पण
सोशल मिडीयावर ओंकार ग्रुप कडे 2 अथवा 3 हजार कोटीची ऊसबील थकली आहेत अशा अफवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही मंडळी पसरवत आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवून नये.
बाबुराव बोत्रेपाटील यांचे एकच ध्येय आहे कि शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देऊन शेतकरी ऊस तोडणी मजुर वाहतुकदार यांची प्रगती करणे असेही ओमराजे बोत्रेपाटील म्हणाले.
