Type Here to Get Search Results !

श्रीगोंदा : महाराष्ट्र शासनाने नुकतीच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे.


 


महाराष्ट्र शासनाने नुकतीच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेत अनेक निकष लावण्यात आले असून, स्लॅबचे घर असलेले, चारचाकी वाहनधारक, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे संचालक, मासिक ₹२५,००० पेक्षा अधिक वेतन असलेले शेतकरी तसेच माजी सैनिक यांना कर्जमाफीस अपात्र ठरविण्यात आले आहे.


तसेच सन २०१९ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ₹५०,००० इतकाच लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्गात नाराजी पसरली असून, शासन शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंगाचे काम करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


शासनाच्या या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच कर्जमाफीवरील सर्व निकष रद्द करून कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सर्व शेतकऱ्यांना सरसकट ₹२ लाखांची कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी लोणी व्यंकनाथ यात्रा उत्सव आखाडा मैदान येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले आहे.


या उपोषणाचे नेतृत्व श्री. लालासाहेब काकडे (माजी चेअरमन, लोणी व्यंकनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था) करीत असून, त्यांच्या समवेत परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला ग्रामस्थ व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात येत आहे.


या आंदोलनाला लोणी गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ मनीषाताई नाहटा उपसरपंच सौ चित्रताई पवार यांनी आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दिला