नांदेड - मन की बात कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण; भाजपच्या संघटनात्मक आढावा बैठकीत एस.आय.आर मोहिमेवर भर
प्रतिनिधि : मजहर शेख, नांदेड
किनवट /माहूर विधानसभा,दि. २८ : भारतीय जनता पक्षाच्या वतीने किनवट येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या संघटनात्मक आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाचे सामूहिक व थेट श्रवण करण्यात आले. यानंतर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) अंतर्गत मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी काळात बूथस्तरावर प्रभावी काम करण्याचे आवाहन यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आले. या बैठकीस भाजपचे प्रदेश महामंत्री सुनील राणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी मराठवाडा समन्वयक ॲड. नितीन काळे, जिल्हा प्रभारी किरण पाटील, आमदार भीमराव केराम, जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीस विधानसभा क्षेत्रातील बीएलए-१, बीएलए-२, बूथ प्रमुख, पक्षाचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेश महामंत्री सुनील राणे यांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एस.आय.आर.) मोहिमेचे महत्त्व विशद केले. मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी बूथस्तरावर काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना देत किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील एकही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आमदार भीमराव केराम यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी तीन महिने संघटनात्मक कार्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आवाहन केले. मतदार यादी शुद्धीकरण हे केवळ निवडणुकीचे नव्हे तर लोकशाही बळकट करण्याचे महत्त्वाचे कार्य असल्याचे सांगत प्रत्येक बूथवर जबाबदारीने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मराठवाडा समन्वयक ॲड. नितीन काळे यांनी एसआयआर मोहिमेत आमदार भीमराव केराम व त्यांच्या कार्यसंघाने केलेल्या कार्याचे कौतुक केले. आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत किनवट-माहूर विधानसभा क्षेत्रात झालेल्या विकासकामांचाही गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बीएलए-१ बाबुराव केंद्रे, मंडळ अध्यक्ष स्वागत आयनेनीवार, उमाकांत करहाळे, बालाजी आलेवार, माहूरचे निळकंठ मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिनकरराव चाडावार, आनंद मच्छेवार, शिवराज राघु मामा, गोविंद अंकुरवाड, कपिल करेवाड, प्रा. राजेंद्र केशवे, संदीप केंद्रे, व्यंकटराव नेम्मानिवार, दिनकर दहिफळे, अशोक नेम्मानिवार, श्रीनिवास नेम्मानिवार, श्रीकांत घोडेकर, बाळकृष्ण कदम,संजय रेड्डी येल्टीवार, दत्ता आडे, ॲड.नैतिक नाईक, बबलू नाईक, भगवान हुरदुके, संतोष पेळे, पप्पू अरमाळकर, प्रदीप येडके, विवेक केंद्रे, स्वाप्निल गरडे, सागर पिसारीवार, विश्वास कोल्हारीकर, सागरताई शिंदे, आमदार केराम साहेबांचे स्विय सहाय्यक बंटी फड, पूनम दीक्षित, जय वर्मा,यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व कार्यकर्ते उपस्थित होते.
