Type Here to Get Search Results !

पारनेर : वन भोजनातून जलसंधारण कामाच्या समाधानाची तृप्ती | आम्ही टाकळीकरच्या 35 दिवसांच्या जल अभियानाची यशस्वी सांगता

 वन भोजनातून जलसंधारण कामाच्या समाधानाची तृप्ती



 आम्ही टाकळीकरच्या 35 दिवसांच्या जल अभियानाची यशस्वी सांगता


 पारनेर: पावसाळी वातावरणातील थंड हवेतील आल्हादायक गारवा... त्यात घरच्या डब्यांमधील विविध व्यंजनांचा घमघमाट.. विविध प्रकारच्या चटण्या.. लोणची... झणझणीत लाल - हिरव्या मिरच्यांचा ठेचा.. तोंडी लावायला कांदा, लसूण, लिंबू, काकडीच्या फोडी... अन् ताज्या गावरान आंब्याचे पाड - जांभळांची स्वीट डिश... पंचतारांकित हॉटेलच्या महागड्या मेनूला फिकी पाडणारी असल गावरान फक्कड मेजवानी व सोबतीला निसर्गाच्या सानिध्यात जल अभिनयाच्या गप्पांची मैफील जमल्यावर आपोआप सर्वांची ब्रम्हानंदी टाळी लागली ...!

निमित्त होते आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानने नाम फाऊंडेशनसह विविध संस्थांच्या सहयोग व लोकसहभागातून राबविलेल्या जलसंधारण कामाच्या दुसऱ्या टप्प्याच्या यशस्वी सांगता पाहणी प्रसंगी आयोजित केलेल्या वन स्नेहभोजनाची...

आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक, पत्रकार चाँद शेख यांनी जल अभियानाचे विवेचन करताना वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक प्रकल्पांची माहिती देत शिक्षण, आरोग्य व जलसंवर्धन या त्रिसूत्रीवर ग्रामविकासाची चळवळ आम्ही टाकळीकर राबवत असल्याचे  सांगितले.

यावेळी आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पुणे नोबेल हॉस्पिटलचे वरिष्ठ संचालक डॉ. बाळासाहेब बांडे, शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले, सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, आम्ही टाकळीकरचे स्थानिक समन्वयक संतोष सोनवळे, प्राचार्य बाळासाहेब खिलारी, माजी सरपंच शिवाजी खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, ग्रा. पं. सदस्य दत्तात्रय निवडुंगे, प्रताप खिलारी, संदीप खिलारी, मेजर दिगंबर शेळके, आदिनाथ पायमोडे, मंगेश खिलारी, दादाभाऊ नवले, संदीप झावरे, आनंदा झरेकर, श्रावण गायकवाड, प्रा. किसन पायमोडे, नानासाहेब झावरे, रविंद्र पायमोडे, वसंत रांधवण, संजय कुसकर, दादा निवडुंगे, राहुल धुमाळ, नितीन धुमाळ, महेश धुमाळ, शिवाजी कोरडे, सचिन बांडे, महेश ठाणगे, जालिंदर बांडे, संकेत थोपटे, दीपक ढूस, गणेश चव्हाण, शुभम गुंदेचा, कृष्णा बांडे, सागर थोपटे, संजय झावरे, अतुल सैद,  नितीन ढोकळे, विष्णू बद्रे, नितीन ढोकळे, बाबाजी कासुटे आदींसह युवक, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चौकट 

 पुढील वर्षीच्या कामाला मंजुरी 

नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्सने टाकळी ढोकेश्वर येथे आम्ही टाकळीकरच्या माध्यमातून झालेल्या यशस्वी जल अभियानामुळे प्रभावित होऊन पुढच्या वर्षी मार्चमध्येच या कामांना पुन्हा मंजुरी दिली असून राज्य शासनाच्या माध्यमातून या अभियानास सर्व मदत मिळणार असल्याची माहिती नाम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विशाल नगरे व टाटा मोटर्सचे जिल्हा समन्वयक प्रसाद जाधव यांनी यावेळी दिली.