नेवासा - तलवार बाळगणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
Vo...अवैधरित्या घरात तलवार बाळगणे एका तरुणाच्या अंगलट आले आहे. नेवासा पोलिसांनी पिचडगाव येथे 22 जून रोजी रोजी कारवाई करत शुभम ज्ञानदेव चौघुले (रा. पिचडगाव ता. नेवासा ) याच्या घरातून अंदाजे 27 इंच लांबीची गोलाकार पितळी मूठ असलेली स्टीलची तलवार अंदाजे 3 हजार रुपये किमतीची हस्तगत केली आहे. आरोपीच्या घरात अवैध तलवार मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सुदामदेव रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तलवार बाळगल्याने आरोपीला जेलची हवा खावी लागत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, वैभव कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोहेकॉ. एस. डी. राठोड, पोहेकॉ. बी. बी. काळोखे, पोकॉ.डी. एस. रसाळ, पो कॉ.एस. व्ही. राठोड, पोकॉ.ए. एस. शेख यांनी केली असून पुढील तपास पोहेकॉ.बी. बी. काळोखे हे करीत आहेत.
