नेवासा - गावठी कट्ट्यासह आरोपी गजाआड
Vo... अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात अहिल्यानगर चे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. नेवासा पोलिस ठाणे हद्दीतील हांडीनिमगाव शिवारात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून एलसीबीच्या पथकाने गावठी कट्टा ( पिस्टल ) व 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सराईत आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर यापूर्वीही अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात यापूर्वी 15 गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. या कारवाईमुळे अवैध गावठी कट्टे बाळगणारयांचे धाबे दणदणले आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नेवासा तालुक्यातील हांडीनिमगाव शिवारातील जीओ पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून ही कारवाई केली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सपोनी/ हरिष भोये, पोउपनि/ संदीप मुरकुटे, पोअं/ विष्णु बागवत, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाट, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, महिला पोअं/ सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांनी यशस्वी केली. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.
