ढवळपुरी आश्रमशाळेच्या राहुल शेवंतेचा MHT-CET मध्ये ९४.१९% चा गौरवशाली यश.
पारनेर /प्रतिनिधी.
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (आश्रमशाळा) येथील विद्यार्थी राहुल राजेंद्र शेवंते याने MHT-CET (PCM) परीक्षेत ९४.१९ टक्के गुण मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेने राहुलचा सत्कार करून त्याचा गौरव केला.
यावेळी प्राचार्य श्री. बापूसाहेब रुपनर सर, मुख्याध्यापक श्री. संदीप महांडुळे सर, शिक्षक श्री. फंड सर, श्री. मिसाळ सर, श्री. देवकाते सर, श्री. महांडुळे सर, श्री. वाघमारे सर, श्री. दातीर सर, श्री. सय्यद अमीन सर, श्री. शेंडगे सर यांच्यासह सर्व शिक्षकांनी राहुलच्या यशाचे श्रेय त्याच्या मेहनतीला व मार्गदर्शनाला दिले.
विशेष सत्कार इतर मागास बहुजन कल्याण विभाग अहमदनगर यांच्या वतीने सहा. संचालक मा. श्री. विनोद लोंढे साहेब, लेखाधिकारी मा. श्री. संजय शेलार साहेब, निरीक्षक मा. श्री. कातकडे साहेब, मा. श्री. लाड साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शाहिद काझी सर, सचिव मा. श्री. रेहान काझी सर, ढवळपुरीचे सरपंच सौ. नंदाताई भागाजी गावडे, उपसरपंच श्री. बबनराव पवार, सेवा संस्थेचे चेअरमन श्री. भागाजी गावडे, माजी सरपंच डॉ. राजेश भनगडे, चेअरमन श्री. सुखदेवजी चितळकर यांसह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने राहुल व त्यांचे पालक श्री. राजेंद्र शेवंते यांचे अभिनंदन केले.
राहुलच्या यशाने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांसाठी त्याने प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.
