Type Here to Get Search Results !

पारनेर : टाकळी ढोकेश्वरमध्ये घडले हिंदू - मुस्लिम ऐक्याचे दर्शन - वै. बबन महाराज पायमोडे यांच्या दिंडीचे दर्ग्यात स्वागत

 




टाकळी ढोकेश्वरमध्ये घडले हिंदू - मुस्लिम ऐक्याचे दर्शन


वै. बबन महाराज पायमोडे यांच्या दिंडीचे दर्ग्यात स्वागत


पारनेर:  हिंदू - मुस्लिम ऐक्याची परंपरा असणाऱ्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे वै. ह. भ. प. बबन महाराज पायमोडे यांच्या पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना मुस्लिम बांधवांनी हजरत सुफी इस्माईलशहा बाबा दर्गाह येथे या दिंडीचे उत्साहात स्वागत केले. यावेळी दिंडी रथावर पुष्पवृष्टी करून वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला. दिंडी चालकांच्या वतीने बाबांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली. 

मुस्लिम जमातचे अध्यक्ष अशपाक हवलदार यांनी सर्वांचे स्वागत केले. आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक तथा पत्रकार चाँद शेख यांनी या उपक्रमाचे विवेचन करताना दिंडी पारंपरेतील हिंदू - मुस्लिम ऐक्याची विविध उदाहरणे देत दरवर्षी दिंडी स्वागताची प्रथा जपली जाणार असल्याचे सांगितले.वारकरी व सुफी संप्रदाय यात अनेक समान दुवे असून हे दोन्ही पंथ समानतेची व मानवतेची शिकवण देताना कर्मकांडाला थारा देत नाहीत. या दोन्ही संतांच्या या गळाभेटीने हिंदू -  मुस्लिम एकतेचे धागे अधिक घट्ट बांधले गेले असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी सरपंच अरुणाताई खिलारी, माजी सरपंच शिवाजी खिलारी,  संजय उदावंत, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाबासाहेब खिलारी,  दिंडी चालक रवींद्र पायमोडे, शंकर रांधवण अशोक झावरे, ग्रा. पं. सदस्य भाऊसाहेब खिलारी, संतोष सोनावळे, संकेत झावरे, मळीभाऊ रांधवण, अंकुश पायमोडे, रावसाहेब झावरे, संदीप खिलारी, शिराजभाई  हवलदार, चाँदशेठ इनामदार, बशीरभाई हवलदार, आदमभाई हवलदार, मुजावर उस्मानभाई, राजू शेख, साजिद पटेल, सद्दाम इनामदार, छोटूभाई हवलदार, अल्ताफ शेख, निसार शेख, आमीन पिंजारी, हर्षब मुजावर, रमजान शेख, अफसर शेख, सोहेल हवालदार,  निहाल हवालदार, शाहिद शेख,फैजान मोमीन, अब्दुल हवालदार, हाफिजी सुलेमान पटेल आदींसह ग्रामस्थ, वारकरी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजिजभाई हवलदार यांनी आभार मानले. 

 चौकट

दोन महानुभाव मित्रांची गळाभेट 

वै. ह भ प बबन महाराज पायमोडे व पैगंबरवासी हजरत सुफी इस्माईलशहा बाबा हे लहानपणापासूनचे सवंगडी होते. या उपक्रमाने वारकरी संप्रदाय व सुफी संप्रदायातील या मित्रांची जणू गळाभेटच झाली. यावेळी पावसासाठी हिंदू - मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली.