Type Here to Get Search Results !

पारनेर – टाकळी ढोकेश्वर येथे गुरुपौर्णिमा उत्सव व शिष्यगण मेळावा बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी भव्य स्वरूपात साजरा होणार


 


टाकळी ढोकेश्वर येथे गुरुपौर्णिमा उत्सव व शिष्यगण मेळावा

पारनेर – श्री. रामदास भाऊसाहेब बांडे शिष्य मंडळाच्या वतीने टाकळी ढोकेश्वर येथील श्री भैरवनाथ मंदिर, बांडे मळा येथे गुरुपौर्णिमा उत्सव २०२६ आणि शिष्यगण मेळावा बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी भव्य स्वरूपात साजरा होणार आहे.

या मेळाव्यात सकाळी ९:३० ते १०:३० वाजेपर्यंत ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज रोकडे (वडगाव सावताळ) यांचे सुश्राव्य प्रवचन होणार आहे. त्यानंतर सकाळी १०:३० ते ११:३० वाजेपर्यंत शाहीर अण्णासाहेब चौरे (सर), शाहीर शांताराम किनकर साहेब तसेच संगीत रत्न भाऊसाहेब आंधळे यांचा भक्तिमय भजन कार्यक्रम सादर होईल. दुपारी १ वाजता जागरण गोंधळ सादर होणार असून त्यामध्ये श्री. साकर ठाणगे आणि श्री. बाळासाहेब निवडुंगे सहभागी होणार आहेत.

याशिवाय सकाळी १० वाजता गरजवंतांना वस्त्र वाटप करण्यात येईल, तर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसाद वितरित केला जाईल. महाप्रसादाचे अन्नदाते श्री. अशोक गंगाराम चव्हाण, श्री. महेश धोंडीराम सर्वन (त्र्यंबकेश्वर), श्री. जालिंदर प्रभाकर वाबळे आणि श्री. महेश रामदास बांडे हे आहेत.

या कार्यक्रमास लोकनेते खा. मा. निलेशजी लंके, आमदार मा. काशिनाथ दाते सर, मा. सौ. शालिनीताई विखे पा. आणि मा. सुजितराव झावरे पा. यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. श्री. सिताराम खिलारी सर आणि अध्यक्ष श्री. अशोकशेट कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव यशस्वी होणार आहे.

या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार मित्र, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, चेअरमन, व्हाइस चेअरमन, सर्व संचालक मंडळ तसेच भैरवनाथ मित्र मंडळ, बनाई मित्र मंडळ, नवभारत मित्र मंडळ, समस्त बांडे परिवार आणि टाकळी ढोकेश्वर येथील सर्व ग्रामस्थ व शिष्यगण परिवाराच्या विनंतीवरून सर्वांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रामदास बांडे यांनी केले आहे.