प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन
(प्रतिनिधी सुनिल पिंगळे शिक्रापूर)
प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तळेगाव ढमढेरे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर तालुक्याचे मा. आमदार सूर्यकांत काका पलांडे, खेड तालुक्याचे माजी आमदार राम कांडगे , शिरूर पंचायत समिती सभापती आनंदराव हरगुडे , समता परिषद जिल्हा अध्यक्ष माननीय गोरख नाना भुजबळ , संभाजी भुजबळ पतसंस्थेचे चेअरमन माननीय राजाराम शिंदे,डॉक्टर ब्रह्माकुमार पंकज भाई भुजबळ तसेच तळेगाव ढमढेरे सेवा केंद्राचे सर्व ब्राह्मण परिवार यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात राज योगिनी ब्रह्माकुमारी लतिका यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगताना निराकार परमपिता शिव परमात्मा हाच सर्व मनुष्य आत्म्यांचा सदगुरू, सर्वांचा कल्याणकारी, सुखकर्ता, दुखहर्ता सर्व गुरूंचाही गुरु सतगुरु आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, निर्विकारी ज्योती बिंदू स्वरूप असा एकच शिव परमात्मा आहे. व तोच सर्व मनुष्य आत्म्यांची सद्गती करू शकतो. हे सांगितले
सूर्यकांत जी पलांडे काका यांनी ब्रह्माकुमारी च्या माउंट आबू येथील मुख्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांचा अनुभव सर्वा समोर कथन केला माउंट आबू येथील ब्रह्माकुमारी चा परिसर म्हणजे साक्षात स्वर्ग आहे असे नमूद करताना प्रत्येकाने एकदा तरी ब्रह्माकुमारीच्या माउंट आबू येथील मुख्यालयाला भेट दिली पाहिजे असे सांगितले.
खेड तालुक्याचे माजी आमदार राम कांडगे यांनी सांगितले की ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत सावता माळी,एकनाथ महाराज, यासारख्या अनेक संतांनी भगवद गीतेच्या ज्ञानानुसार समाजाला दिशा देण्याचे काम केले. परंतु ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयामध्ये सच्ची गीता ज्ञान परमपिता शिव परमात्मा द्वारे दिले जात आहे. हे स्पष्ट केले या ठिकाणी सहज राज योगाच्या शिक्षणासाठी मी दोन वेळा ब्रह्माकुमारीच्या माउंट आबू येथील मुख्यालयात गेलेलो आहे. व यावर्षीही पुन्हा जाण्याच्या तयारीत आहे. हे स्पष्ट केले .
ब्रह्माकुमारी अर्चना दीदींनी सर्वांचे स्वागत केले आणि ब्रह्माकुमारी विद्यालयाचा सत्य परिचय व परम सद्गुरु परमपिता परमात्मा शिव यांची ओळख आपल्या वाणीतून व्यक्त केली
या वेळी सभापती आनंदराव हरगुडे व गोरख नाना भुजबळ यांनीही गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देताना माउंट आबू येथील आपापले अनुभव व्यक्त केले. व ब्रह्मा कुमारी ज्ञानाच्या आधारे मनुष्य आत्म्यांचे जीवन सहज व सुखकारक होऊ शकते असे सांगितले. कार्यक्रमासाठी माजी सरपंच शिक्रापूर श्री सुभाष खैरेजी माजी सरपंच दोरगे ताई माजी सरपंच भुजबळ ताई आणि अनेक मान्यवर मंडळी तसेच ब्रह्मा कुमारी सर्व ब्राह्मण परिवार उपस्थित होते.
यामध्ये तळेगाव ढमढेरे येथील कैलास भुजबळ यांचे सुपुत्र डॉक्टर पंकज यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
सर्वसाधारण व शेतकरी कुटुंबातील हा बालक स्वतःच्या कष्टाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच. डी. झालाय हे आपल्या गावासाठी भूषण आहे. असे म्हणत सर्वांनी त्याचे कौतुक व अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता दरेकर आणि स्वाती देवकाते यांनी केले आभार प्रदर्शन सौ. पुष्पा शिंदे यांनी केले आणि सर्वांना ब्रह्मा भोजन देवून कार्यक्रम संपन्न झाला
