Type Here to Get Search Results !

खावटीचा लाभ बिगर आदिवासींना दया. गौतम खरात

खावटीचा लाभ बिगर आदिवासींना दया. गौतम खरात

खावटी अनुदानाचा लाभ दलित कुटुंबांना व आदिवासी भागात रहाणाऱ्या  बिगर आदिवासी कुटुंबाना मिळावा अशी मागणी युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष गौतमराव खरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे याच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

       राज्यात  उदभवलेल्या कोरोना विषाणूंच्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेने राज्यात हाहाकार माजवला आहे राज्यात सर्वत्र संचारबंदी व  लॉकडाऊन असून अनु जाती व नवबौद्ध समाजाच्या  कुटुंबसमोर तसेच आदिवासी डोंगराळ भागात राहणारे बिगर आदिवासी( खुला वर्ग,इतर मागास प्रवर्ग पारंपरिक व्यवसाय करणारे कुंभार,सुतार,लोहार ,न्हावी मातंग,चर्मकार भराडी, इत्यादीलोकांसमोर बेरोजगारी चा प्रश्न गेल्यावर्षभरा पासून निर्माण झाला असून रोजगाराचा ही प्रश्न निर्माण झाला आहे दलित समाजातील बहुतेक कुटुंब ही पारंपरिक व्यवसायावर व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी आहेत त्यात बहुतेक लोक भूमिहीन असून पारंपरिक व्यवसाय मग वाजंत्री मंडळी,बेंजो ,ऑर्केस्ट्रा चालविणारे ,बँड पथक ,पारंपरिक पद्धतीने झाडू बनविणारे ,टोपल्या बनविणारे मंडळींचा व्यवसाय  थांबला असून त्यांना शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही तर मोलमजुरी करणेही लॉकडाऊन मुळे  अडचणीचे झाले आहे अशा आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील दलित कुटुंबाना व आदिवासी भागात रहाणाऱ्या बिगर आदिवासी कुटुंबाना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर सामाजिक न्याय विभागाकडून खावटी अनुदान योजना सुरू करून दलित समाजाला न्याय द्यावा

       सदर योजनेत पात्र लाभार्थी निवड करताना आर्थिक दृष्ट्या सधन असलेल्या ,शासकीय,निमशासकीय कर्मचारी याना सदर योजनेत न घेता  गरीबातील गरीब हाच निकष लावून प्रत्येक तालुकास्तरावरील अनु जातीच्या प्रीतक्त्या महिला,घटस्फोटित महिला,विधवा महिला, भूमिहीन शेतमजूर अपंग असलेल्या व्यक्ती अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब आशा गरजू लोकांची /जुटुंबांची निवड करून  त्यांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळावा

       सदर योजनेस पात्र कुटुंबाना त्यांच्या रेशनकार्ड वरील युनिट प्रमाणे कुटुंबातील लोकसंख्ये नुसार ४ युनिट पर्यंत २०००/-रुपये ५ ते ८ युनिट पर्यंत ३०००/-रुपये तर ८ युनिट च्या पुढे ४०००/- रुपये प्रमाणे वाटप करण्यात यावे सदर खावटी अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या  बँक अकाउंटवर निधी वर्ग करण्यात येऊन 

लॉकडाऊन काळात व कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य शासनाने न्याय द्यावा  अशी मागणी खरात यांनी केली आहे