Type Here to Get Search Results !

पुण्यातील कलाकारांना साठी कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आठवड्यातून दोन दिवस मोफत लसीकरण- विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ

पुण्यातील कलाकारांना साठी कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आठवड्यातून दोन दिवस मोफत लसीकरण- विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ


पुणे प्रतिनिधी:पुण्यातील  कलाकारांना साठी आठवड्यातुन दोन दिवस कमला नेहरू हाॅस्पिटल मध्ये पुणे शहरातील सर्व कलाकारांसाठी मोफत लसीकरण केंद्र  सुरू करणार विरोधीपक्ष नेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांची माहिती.

पुणे शहर सांस्कृतिक माहेरघर आहे. या पुणे शहरातील कलेच्या विविध घटकातील कलाकार आज कोरोनाच्या महामारीमुळे हतबल झाले आहे. नाटयगृह व सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलेवरती पोट असणा या कलाकारांना उपासमारीची वेळ आली आहे. या धर्तीवर कलाकारांचे महानगरपालिकेच्या माध्यमातुन कोविड लसीकरण झाल्यास त्यांना कार्यक्रम करणे सोयिस्कर होईल व त्या अनुषंगाने नाट्यगृह लवकरात लवकर खुली होतील व त्यांना बाहेरच्या कार्यक्रमास बोलवले जाईल त्यांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल व त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. 

या विषयाला अनुसरुन कलाकारांचे श्रध्दास्थान असलेले पुणे महानगरपालिकेचे बालगंधर्व रंगमंदीर लसीकरणा करीता योग्य ठिकाण ठरेल तरी पुणे शहरामधील कलाकारांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र तातडीने चालु करण्यात यावे. आश्या मागणी चे निवेदन पुणे महानगरपालिका उपआयुक्त रुबल अग्रवाल विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी दिले आहे या वेळी निवेदन देतांना अभिनेते विजय पटवर्धन ,राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील,माजी नगरसेवक बाबा धुमाळ,अभिनेते राजू बावडेकर,अभिनेते योगेश सुपेकर , प्रसाद कुलकर्णी,गणेश गायकवाड उपस्थित होतेआठवड्यातुन दोन दिवस कमला नेहरू हाॅस्पिटल मध्ये पुणे शहरातील सर्व कलाकारांसाठी मोफत लसीकरण केंद्र सुरू करणार. विरोधीपक्ष नेत्या सौ दिपाली प्रदीप धुमाळ यांची माहिती.