दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून दगड व दांड्याने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून प्रवीण आढाव यांना दगडाने व लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. राहुरी तालूक्यातील सडे येथे दिनांक ७ जानेवारी रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत प्रवीण आढाव हे जखमी झालेत.
प्रविण रावसाहेब आढाव, वय ३० वर्ष, रा. सडे, ता. राहुरी. दि. ७ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास राहुरी तालूक्यातील सडे गावातील महादेववाडी येथील महादेवाचे मंदीरासमोर उभा होते. तेव्हा तेथे आरोपी हे दारु पिउन आले व प्रवीण आढाव यांना म्हणाले की, आम्हाला दारु पिण्यासाठी पैसे दे.
त्यावेळी प्रवीण आढाव त्यांना म्हणाले कि, माझे जवळ पैसे नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. याचा त्यांना राग आल्याने त्यांनी प्रवीण आढाव यांना दगड व लाकडी दांड्याने मारहाण करुन वाईट वाईट शिवीगाळ केली. तसेच पुन्हा आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडनार नाही, अशी धमकी दिली.
प्रवीण रावसाहेब आढाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) पप्पु ज्ञानदेव शिंदे, २) विशाल शरद बर्डे, दोघे रा. सडे, ता. राहुरी. या दोघांवर गुन्हा रजि. नं. ३८/२०२३ भादंवि कलम ३२४,३३७,३३८,५०४,५०६,३४ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
