Type Here to Get Search Results !

राहुरी - मार्केट कमिटी निवडणुक प्रोग्राम सर्व सामान्य उमेदवाराला घातक.

 मार्केट कमिटी निवडणुक प्रोग्राम सर्व सामान्य उमेदवाराला घातक.



बाजार समीतीत उमेदवाराचा प्रचारा अभावी पराभव झाल्यास आम्ही न्यायालयात जाणार- सुरेश लांबे.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी मार्केट कमिटी संचालक मंडळ निवडणुक सन २०२३-२८ या कालावधीसाठी होणारी निवडणुक प्रोग्राम चुकीचा असुन तो सर्व सामान्य उमेदवाराला घातक आहे. यामध्ये शेतकरी व सामान्य उमेदवार यांना या निवडणुकीतुन परावृत्त करण्याचा सरळ सरळ हेतु निवडणुक आयोग व प्रस्थापित पुढाऱ्यांसह सरकारचा आहे.


विद्यमान सरकारने सर्व शेतकऱ्यांना मार्केट कमिटी निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क देण्यात येईल. अशी वल्गना केली होती. परंतु शेतकऱ्यांना निवडणुकीत निव्वळ उभा राहण्याचा अधिकार दिला. त्यासाठी ५ हजार अनामत रक्कम सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य हे सुचक अनुमोदक लागतील.


 अशी अट घालुन शेतकऱ्यांना उभा राहण्याचा अधिकार देऊन प्रचार कालावधी अल्प करून शेतकऱ्यांची एक प्रकारे शासनाने थट्टाच केली. हा प्रश्न आम्ही माजी मंत्री आ. बच्चुभाऊ यांच्याकडे मांडणार, असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश लांबे यांनी व्यक्त केले.


राहुरी मार्केट कमिटी संचालक मंडळ निवडणुक सन- २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुक प्रोग्राम पुढील प्रमाणे. अर्ज भरणे दिनांक- २७/३/ २०२३ ते ३/४/ २०२३ आठ दिवस त्यामध्ये ३ दिवस सुट्ट्या अर्ज भरण्यासाठी फक्त ५ दिवस.


अर्ज छाननी दिनांक- ५/४/२०२३, अर्ज माघार दिनांक- ६/४/२०२३ ते दिनांक- २०/४/२०२३ अर्ज मागे घेण्यासाठी १५ दिवस मुदत आहे. चिन्ह वाटप दिनांक २१/४/२०२३ पासुन ते मतदान दिनांक २८/४/२०२३ पर्यत आठ दिवस आहेत.


त्यातील चिन्ह वाटपाचा दिवशी उमेदवाराला त्या दिवशी चिन्ह मिळते. त्यानंतर उमेदवाराला मतदारा पर्यंत जान्यासाठी आपले नाव अनुक्रम नंबर व चिन्ह ही ओळख पोहोचवण्यासाठी मत पत्रिका छपाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे तो दिवस व रात्र त्यातच जाते व निवडणुक आयोगाच्या नियमा प्रमाणे प्रचार मतदानाच्या आधी एक दिवस बंद होतो. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी फक्त ५ दिवस मिळतात.


अशा पध्दतीने अर्ज भरणे पासुन ते मतदान दिवसा पर्यत ३३ दिवसाचा प्रोग्राम असुन यामध्ये प्रचारासाठी फक्त ५ दिवस कालावधी मिळतो. अशा एकुण परिस्थितीमध्ये सर्व सामान्य शेतकरी वर्गातील उमेदवाराने सोसायटी मतदार संघातील ११० सोसायटीचे १३८२ मतदार व ग्रामपंचायत मतदार संघातील ८३ गावातील ९६६ मतदारांन पर्यत आपले चिन्ह कसे पोहचवावे व प्रचार कसा करावा व मतदाराचे मतपरिवर्तन कसे करावे.


तरी निवडणुक आयोग व निवडणुक अधिकारी यांनी प्रचारासाठी आणखी १५ दिवस मुदत वाढवावी. मुदत वाढ न मिळाल्यास सर्व सामान्य उमेदवाराचा प्रचारा अभावी पराभव झाल्यास आम्ही न्यायालयात जाणार. असे मत शेतकरी नेते सुरेश लांबे यांनी व्यक्त केले. 


तरी सर्व सामान्य शेतकरी व सोसायटी, ग्रामपंचाय सदस्य यांनी या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र जोडुन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपला अर्ज भरावा व कष्टकरी शेतकऱ्यांची होणारी लुट थांबवावी. असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश लांबे यांनी केले.