Type Here to Get Search Results !

नांदेड - 'आनंदाचा शिधा ' किनवट तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळालाच नाही

 नांदेड - 'आनंदाचा शिधा ' किनवट तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळालाच नाही.



प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड


नांदेड /किनवट,दि,३०:- राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने गुढीपाडवा व डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला आनंदाचा शिधा किनवट तालुक्यातील शिधापत्रीकाधारकां पर्यंत अद्यापपर्यंत पोहोचलाच नाही .  तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून स्वस्त धान्य योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखर एक लिटर पामतेल एक किलो चणाडाळ व एक किलो रवा अशा वस्तू असलेला आनंदाचा शिधा संच वाटप करण्याचा निर्णय घेतला . लाभार्थ्यांना यापुर्वी शिंदे फडणवीस सरकारने गोरगरिबांची दिवाळी साजरी व  गोड व्हावी याकरिता असाच आनंदाचा शिधा संच तालुक्यातील लाभार्थ्यांना वाटप केला होता मात्र त्याही वेळेस आनंदाचा शिधा संचाची मागणी व जिल्हा पुरवठा विभागामार्फत पुरवठा हा वेळेवरच करण्यात आला होता . तर २१ मार्च पर्यंत ही जिल्हा पुरवठा विभागा मार्फत तालुक्यातील गोडाऊन मध्ये शिधासंचाचा पुरवठा करण्यात आला नव्हता . यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी या आनंदाच्या शिधा संचाचा उपयोग स्वस्त धान्य शिधापत्रिका धारकांना झाला नसल्याचे दिसून आले .  यामध्ये अंतोदय, प्राधान्य, एपीएल,केसरी योजनेतील लाभार्थी या सर्वांना या आनंदाच्या शिधा संच चा लाभ जर सणाच्या वेळेस होत नसेल तर याचा काय उपयोग ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केवळ गोरगरिबांना खुश करण्याकरिता अशा योजनांची शासनाकडून घोषणा केल्या जाते मात्र तिची अंमलबजावणी वेळेवर केल्या जात नाही अशी खंतही अनेक लाभार्थ्यांनी  यावेळी बोलून दाखविली आहे.