Type Here to Get Search Results !

नांदेड - लाखो वाहनांचे तपासणीसाठी आरटीओचे महिन्यातून एकदा चक्कर

 नांदेड - लाखो वाहनांचे तपासणीसाठी आरटीओचे महिन्यातून एकदा चक्कर.




दलालांचा सुळसुळाट वाहनधारक त्रस्त.


तपासणीच्या नावावर तासंतास उभे करून आरटीओ देतात महिला व वृद्धांना  प्रचंड मानसिक त्रास

आरटीओचे माहूर शहरात स्वतंत्र कार्यालय उभारावे


प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड

 

नांदेड/माहूर,दि :१:-  शहर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून येथे दिवसागणिक हजारो वाहने येतात तर यात्रा काळात लाखोच्या संख्येने वाहन येथे येऊन जातात तसेच शहरातही हजारो वाहने असून या सर्वांच्या कागदपत्राच्या तपासणीसाठी तसेच नवीन शिकावू वाहनधारकांना वाहन परवाना व इतर कागदपत्रे देण्यासाठी महिन्यातून एक दिवस आरटीओ माहूरला येत असल्याने नागरिकांची कागदपत्र अभावी हेळसांड होत असून कागदपत्रे नसलेली वाहने बाहेरगावी गेल्यास त्यांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याने आरटीओ चे स्वतंत्र कार्यालय माहूरला तयार करावे अशी मागणी होत आहे


महाराष्ट्र मोटर वाहन विभाग नांदेड कडून माहूर शहरातील वाहनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याला 30 किंवा 31 तारखेला माहूरच्या विश्रामगृहावर कॅम्प घेण्यात येतो या कॅम्पमध्ये एक दोन अधिकारी व एक कर्मचारी येऊन नागरिकांची कामे करतात यासाठी विश्रामगृहाच्या बाहेर दलालांना बसविले जाते आणि त्या दलालाकडून कागदपत्रे ओके करून विश्रामगृहांमधील सूटमध्ये थांबलेल्या अधिकाऱ्यासमोर पाठविले जाते हे काम नियोजनबद्ध पद्धतीने होते परंतु सूटमध्ये थांबलेल्या अधिकाऱ्यांना जेवण आणि इतर कामासाठी वेळ पुरत नसल्याने कागदपत्रे घेऊन महिला वृद्ध नागरिक तासंतास येथे लाईन मध्ये उभे राहतात त्यांना सूटच्या बाजूला असलेल्या खोलीत कैदीला जेलात कोंबल्याप्रमाणे तासं न तास उभे ठेवल्यानंतर अनेक नागरिकांना इतका वेळ उभा राहूनही कागदपत्रात त्रुटी काढून त्यांना पुढच्या महिन्याला या असे फर्मविले जाते त्यामुळे येथे आलेल्या मुली वृद्ध नागरिक संतप्त होऊन शिव्या देत परत जातात


माहूर शहरात असलेल्या वाहनांच्या शोरूम मधून वाहने खरेदी करूनही नांदेड ला जाण्याची पाळी येऊ नये म्हणून नागरिक ऑन मध्ये पैसे देऊन  मनपसंद वाहन आणि नंबर  खरेदी करतात परंतु  त्यापैकी काही नागरिकांनी आरटीओ चा हिशोब चुकता न केल्याने त्यांना पासिंग साठी नांदेडला या असे फर्मविले जात असल्याने माहूरच्या शोरूम मधून वाहन घेऊन काय फायदा असा सवाल ही नवीन वाहन खरेदी केलेले नागरिक येथे उपस्थित करताना दिसले

माहूर तालुक्यातील शोरूम मधून वाहन खरेदी केलेल्या नागरिकांना त्या शोरूम मध्ये सर्विसिंगला गेल्यास सुटे पार्ट मिळत नसल्याने आधीच त्रस्त झालेले नागरिक आरटीओच्या चकरा मारून संत्रस्त झाल्याने माहूर शहरात आरटीओचे कार्यालय महिनाभर सुरूच ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन त्यांना जागा उपलब्ध करून देत त्यांचे कार्यालय निर्माण करून आरटीओ चा एक अधिकारी कायम येथे नेमावा अशी मागणी वाहनधारक नागरिकांतून होत आहे