नांदेड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्ह्यातील बूथ कमेटी अभियानाचा शुभारंभ !
आगामी निवडणूकात युवकांना प्राधान्य; मा.आ.प्रदीप नाईक
प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड
नांदेड/ माहूर,दि, १:- राज्यातील तरुण जास्तीत जास्त आपल्या पक्षाशी जोडला जावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभरात कार्यक्रम आखायला सुरुवात केली आहे,याचा च एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्वादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा.आ.जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर गाव वाडी तांड्यावर पोहचला पाहिजे म्हणून गाव तिथे राष्ट्रवादी घर घर चलो अभियान वन बूथ टेन युथ या कार्यक्रमाचा नांदेड जिल्ह्यातील शुभारंभ माहूर येथे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तर करण्यात आला.
यावेळी जिल्हा बूथ कमेटी अध्यक्ष (उत्तर) डॉ विक्रम देशमुख तळेगावकर,गजानन पापंटवार(दक्षिण)प्रकाश धुप्पे यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी शिवसेनेचे माजी नगर सेवक राजाराम गंधेवाड यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीची घड्याळ हाती बांधली.माजी आमदार प्रदीप नाईक यांनी त्यांना पक्षाचा शेला हार नारळ शाल घालून जाहीर प्रवेश दिला.
दिनांक ३१ शुक्रवार रोजी नांदेड जिल्ह्यातील बूथ कमेटी कार्यक्रमाचा शुभारंभ माहूर येथील विश्राम गृहावर मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आला.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून गाव तिथे राष्ट्रवादी, घर घर चलो अभियान, वन बूथ टेन युथ, ह्या मध्यमातून संबध राज्यभर बूथ कमिटीच्या कामाना गतिशील करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.याच कार्यक्रमाचा नांदेड जिल्ह्यात विस्तार करण्यासाठी माहूर येथून या अभियानाला सुरवात झाली असून तरुणांना सक्रिय राजकारणात आणून पक्षाच्या भूमिकेशी आणि खा. शरदचंद्र पवार यांच्या विचारांशी एकनिष्ठ होऊ समाजसेवा करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्या साठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि किनवट नगर परिषद निवडणुका मध्ये तरुणांना अधिक संधी असेल असे माजी आमदार प्रदीप नाईक म्हणाले.तर विक्रम देशमुख मार्गदर्शन करतांना म्हणाले की,संघटनात्मक बांधणी, कोणी बुथनुसार काय काम केले, सदस्य नोंदणी अभियानात कोणी काय काम केले, याचा अहवाल जयंत पाटील यांना पाठविला जाणार असल्याने सर्व बूथ प्रमूखानी या अभियानात स्वतःला झोकून देत काम करून पक्ष संघटन वाढवावे असे अहवान केले.
या वेळी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मारोती रेकुलवार, माजी जीप सदस्य समाधान जाधव यांची ही समयोचीत भाषणे झाली.या वेळी विनोद राठोड, प्रकाश गायकवाड, राहुल राठोड, कुंदन पाटील पवार, अमित येवतिकर, प्रफुल भुसारे, नितीन मंडळे, डॉ. दिलीप राठोड, ऊकदराव जाधव, इलियास बावानी, अप्सर आली,आशू पठाण, शेख लतीफ, ऋषी खंदारे ,प्रतीक कांबळे, सुनील आडे,निशांत कदम,विनोद खूपसे, अशोक खडसे, तानाजी पवार, निकेश राठोड,अभिजीत राठोड, संतोष राठोड, देवसिंग जाधव, रणधीर पाटील, सुरज भरणे,राजू चव्हाण, उदयपाल मरमट, सुमित खडसे, सत्यम गायकवाड, युवराज आडे, जगदीश राठोड,दयानंद जाधव, आदर्श आडे, गणेश जाधव, प्रकाश राठोड,किनवटचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड,अनिल पाटील कराळे,राहुल नाईक, यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी सभापती दत्तराव मोहिते यांनी तर आभार भगवानराव जोगदंड यांनी मानले या कार्यक्रमाचे संचलन मनोज कीर्तने यांनी तर बैठकीचे नियोजन आयोजक नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केले होते.या वेळी बूट कमिटी प्रसार तालुका प्रभारी म्हणून मनोज कीर्तने यांची तर सह प्रभारी डॉ.राजेश राठोड यांची निवड करण्यात आली.

