Type Here to Get Search Results !

राहुरी - वनविभागात चाललेला अंधाधुंदी कारभाराची सखोल चौकशी करा- अनिल हापसे.

 वनविभागात चाललेला अंधाधुंदी कारभाराची सखोल चौकशी करा- अनिल हापसे.



वनक्षेत्रपालाची ॲन्टी करप्शन विभागाकडे तक्रार.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथिल वन विभागात अनेक भ्रष्टाचार होत असुन वरिष्ठ अधिकारी या भ्रष्टाचारास पाठिशी घालत असुन  वन विभागातील सुरू असलेल्या भ्रष्टाचार व अनागोंदी कारभारा बाबत वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्याकडे व संबंधित वनक्षेत्रपाल या अधिकाऱ्याचे लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात येणार आहे.


राहुरीच्या वन विभागात अनेक भ्रष्टाचार व घोटाळे झालेले आहे. या भ्रष्टाचाराचा खरा सुत्रधार कोण? हे कुणाच्या आशिर्वादाने केला जात आहे ? अधिकाऱ्यांना कुणाचा छुपा पाठिंबा? याची चौकशी करावी. अशी मागणी करण्यात येत आहे.


राहुरी तालुक्यात ८ बीट असुन त्यापैकी ४ बीटांमध्ये वृक्ष लागवडीचे काम करण्यात आलेले आहे. खुप वेगवेगळ्या जातीचे झाडे लावण्यात आले. सदर ४ बीटांमध्ये २० हेक्टरच्या ज्या लागवडी झाल्या आहे. प्रत्येकी एका बीटामध्ये पावसाळ्या पूर्वी झालेला खर्च ६, ८५, ६२४/- इतका निधी मंजुर करण्यात आलेला होता व आहे. 


परंतू प्रत्यक्षात एवढा खर्च न लागता केवळ २,२०,००० इतकाच खर्च आलेला आहे. असा एकुण ४ बिटामध्ये झालेला गैरव्यवहार पाहता सदरचा ४ बीटामधील उरलेले प्रत्येक १८ लाख ६०, हजार ९६/- अक्षरी रु. अठरा लाख साठ हजार ९६ रुपये शिल्लक रक्कम संबंधित अधिकाऱ्यांनी सरकारी तिजोरीत भरले की स्वतःच्या खिशात घातले. याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.


राहुरी तालुक्यातील तब्बल ७०% वने जळून खाक झालेले आहे. तर फायर लाईनसाठी आलेला निधी सोइस्कर रित्या स्वतःच्या खिशात घातला जात असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील फायर लाइन जाळ रेषा तयार झाल्या असत्या तर मोठया प्रमाणात झालेले जंगलाचे नुकसान झाले नसते. व राष्ट्रीय संपत्ती वाचली असती. या आगीमधून हजारो झाडे वाचली असती. 


राहुरी तालुक्यात खोटे व्हावचर बनविण्याचे काम एक वन मजुर करत असल्याचे ही चर्चा होत असुन व्हाऊचर व ते व्हाऊचर कोणाच्या नावाने आहे. याची चौकशी वरिष्ठ स्तरावरुन करणे गरजेचे आहे. व मजुरांचे आधार कार्ड व पॅन कार्ड चेक करावे व याची सत्यता तपासणे गरजेचे आहे. यामधे खोटे अगर बनावट वाटत असेल तर सहीचे नमुने चेक करावे. एका गावच्या मजुराचे नावाने व्हाऊचर बनवुन पेमेंट मात्र दुसऱ्या मजुराला दिले जात असल्याचे ही निदर्शनास आले आहे.


तसेच सर्व्हे नं. २१६, १६३ मध्ये झालेले मातीचे बंधारे व वनतळे बांधणेसाठी हजारो झाडांची कत्तल करवून सदरचे बंधारे बांधण्यात आले. कत्तल केलेली झाडे वखारी वाल्यांना विकले. तरी काही झाडे लोकांनी उचलून नेली. प्रत्यक्षात या झाडांचा लिलाव होणे गरजेचे होते. परंतु असा कुठलाही लिलाव तालुक्यात झालेला नाही. तरी या बंधारे व वनतळयांची काम अतिशय निकृष्ठ दर्जाची झालेली आहे.


 त्यासाठी सदरचे बंधारे उकरून प्रत्यक्ष वरिष्ठ अधिकारी यांनी  पहाणी केल्यास अनेक भ्रष्टाचार उघड होऊ शकतो. राहुरी तालुक्यात झालेले सर्व कामाला व निकृष्ठ दर्जाला सहाय्यक वन संरक्षक व माने मॅडम जबाबदार असल्याची चर्चा होत आहे. काही नागरीकांनी अनेक वेळा प्रत्यक्ष भेटुन पत्रव्यहार करून फोन करुन सांगितले. मात्र वन अधिकारी यांनी  कोणत्याही पत्राला व फोनला काहीच प्रतिसाद दिला नसल्याचे समजले आहे. राहुरीच्या वन विभागातील चाललेला भ्रष्टाचार कोण उघड करणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथिल केकताई शिवरातील सर्व्हे नं. ६७, ६८, ६९ या वन विभागाच्या क्षेत्रातुन रस्त्याच्या कामासाठी हजारो ब्रास माती व मुरुम उचलुन नेला आहे. त्याच प्रमाणे पावसाळ्या पुर्वी झालेले माती बंधारे कोणत्याही प्रकारचा पाया न घेता व काळी माती टाकण्याची गरज अतसांनाही असे काहीही करण्यात आलेले नाही. निव्वळ कागदी घोडे नाचवण्याचे काम केले असल्याचे समजले आहे.


राहुरीतील‌ बारागाव नांदुर हद्दीतील गट क्र. १६३ पार्ट बारागाव नांदुर, प्रथम वर्ष झालेले लागवडीचे काम अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष न दिल्यामुळे पुर्णपणे जंगल नष्ट झालेले आहे. घोरपड़वाडी १६३ पार्ट प्रथम वर्ष तेथेही सुमारे ४०% जंगल जळुन नष्ट झालेले आहे. व मोठया प्रमाणात दोन्ही जंगलात वृक्षतोड झालेली आहे. माती व मुरुमाची अज्ञाताने चोरून नेलेली आहे. 


याबाबत पत्रव्यवहार करुनही काही कारवाई करण्यात आलेली नाही. यामधे मोठी आर्थिक चिरीमिरी झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचीही चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच राहुरी तालुक्यातील वनविभागच्या हद्दीमध्ये असणाऱ्या विहिरी व बोअरवेल हे कुणाच्या आशिर्वादाने चालु आहे. व वनविभागाच्या हद्दीतील अनेक झाडे तोडुन नेली जातात. हे कुणाच्या आशिर्वादाने कत्तल सुरू आहे. याची चौकशी व्होणे गरजेचे आहे. 


वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राहुरी तालुक्यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमी मधुन करण्यात येत असून याबाबत वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना राहुरी वन विभागाचा चाललेला अनागोंदी कारभाराचे भ्रष्टाचारी पुरावे देण्यात येणार आहे. 


राहुरीच्या वन विभागात अनेक भ्रष्टाचार झालेला असुन सर्व अधिकारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अनेक शासकीय योजनांचे कागदी घोडे नाचवण्याचे काम करत अर्थिक भ्रष्टाचार केला आहे. तसेच या भ्रष्टाचाराला पाठिशी‌ घालण्यासाठी अनेकांचा मुक पांठिबा असल्याचे निदर्शनास येत आहे.


वन क्षेत्रपाल युवराज पाचरणे हे काही लोकांना दरवाजा बंद करून तासोतास कॅबिन मधे घेवून बसतात व‌ त्यांच्याशी काहीतरी अर्थिक व्यवहार करत असल्याचे बोलले जात आहे. या अधिकाऱ्याची लाचलूचपत विभागाकडे खातेनिहाय चौकशी करण्याची तक्रार करण्यात येणार असल्याचे समजले आहे.


गेली अनेक वर्षांपासून सुरु असलेला वन खात्यातील भ्रष्टाचार उघड करणार आहे.


यामधे वृक्षतोड, माती बंधारे, दगडी अनगडनाले, जलयुक्त शिवार कामातील भ्रष्टाचार,१० बिटात झालेली अनेक कामे व सध्या सुरू असलेले वृक्ष लागवडीचे खड्डे, वन परिक्षेत्राच्या हद्दीतून गेलेल्या अनेक पाइपलाइन व विद्युत वितरण विनापरवाना आहेत? यासह अदि कामांची चौकशी व्हावी. यासाठी उपोषणास बसणार आहे. यामधुन मार्ग न निघाल्यास आत्मदहन करणार आहे. असे वन कमिटी अध्यक्ष अनिल हापसे यांनी सांगीतले आहे.