घर खाली करण्याच्या कारणावरुन चार जणांकडून दोघा मायलेकाला लाथा बूक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
घर खाली करण्याच्या कारणावरुन चार जणांनी मिळून दोघा मायलेकाला घरात घुसून लाथा बूक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील मल्हारवाडी येथे दिनांक ९ जून २०२३ रोजी घडलीय.
छाया दिलीप गावडे, वय ३९ वर्षे, या राहुरी तालूक्यातील मल्हारवाडी येथे त्यांच्या कुटुंबासह राहत आहेत. छाया गावडे या त्यांच्या शेतात पत्र्याचे शेड करुन राहण्यास आहे. त्यांचा दीर संदीप गणपत गावडे त्याचे कुंटुंबासह मल्हारवाडी गावातील आमचे वडीलोपार्जीत घरामध्ये राहण्यास आहे. सदर वडीलोपार्जीत घरामध्ये छाया गावडे यांचा देखील हिस्सा असुन त्या ठिकाणी त्यांचे संसार उपयोगी वस्तु आहेत.
दि. ९ जून २०२३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास छाया गावडे व त्यांचा मुलगा रोहीत हे त्यांच्या घरामध्ये असताना आरोपी घरामध्ये घूसले. आणि छाया गावडे यांना म्हणाले कि, आम्हाला ऋषिकेश संदिप गावडे याने पाठिवीले आहे. तुम्ही त्याचे घर का खाली करत नाही. असे म्हणुन मला शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली.
त्यावेळी छाया गावडे यांचा मुलगा रोहीत हा सोडविण्यासाठी आला असता त्याला लोखंडी पाईपने केली. तसेच तुम्ही जर ऋषिकेश चे घर खाली केले नाहीतर तुम्हाला जिवे मारु टाकु. अशी धमकी देवुन जाताना आमचे घरातील टि व्ही व खुर्ची तोडुन नुकसान करुन निघून गेले आहे.
घटनेनंतर छाया दिलीप गावडे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) ऋषिकेश संदिप गावडे, २) अजीत खोमणे (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व दोन अनोळखी इसम अशा चार जणांवर गुन्हा रजि. नं. ६३४/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ४५२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
