उत्तर लोकसभाची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे- बाळासाहेब आढाव.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राज्यातील विधान परिषद व कर्नाटक मधील विजयानंतर काँग्रेस पक्षात उत्साहाचा संसार आहे. नुकतीच राहुरी तालुका काँग्रेस पक्षाची संघटन आढावा बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी तालुका कार्यकारणी व जिल्हा कार्यकारणी बाबत काही बदल करून नव्या चेहऱ्यांना तालुका कार्यकारणीत व जिल्हा कार्यकारणीत मध्ये समावेश करण्या बाबत ठरवण्यात आले.
यावेळी जिल्हा समन्वय ज्ञानदेव वाखारे, जिल्हा अनुसूचित जमातीचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शितल वाबळे, राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव आदिसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नागवडे म्हणाले कि, काँग्रेस पक्षाचा देशासाठी खूप मोठे योगदान व बलिदान देणारा पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासून सज्ज राहून कामाला लागावे. आपण जिल्हा परिषद नगरपरिषद पंचायत समिती लढणार असून राहुरी तालुका चे अध्यक्ष बाळासाहेब आढाव व त्यांचे सर्व तालुका पदाधिकारी यांचे काम अतिशय चांगले व सर्व समक्ष असून काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही यावेळी नागवडे यांनी दिली.
यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव, ज्ञानदेव वापरे, राजेंद्र वाघमारे, स्मितल वाबळे, संजय भोसले, बबन ढोकणे, बाबासाहेब सगळे, रोहित पवार, शशिकांत गाडे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव म्हणाले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करीत आहोत. आढाव यावेळी म्हणाले उत्तर लोकसभाची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. तसेच राहुरी तालुक्यात प्रत्येक गावामध्ये शाखा असून तालुक्यात काँग्रेसची चांगली बांधणी झालेली आहे.
काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्षक पक्ष असून हा गोरगरिबाचा पक्ष आहे. तालुका कार्यकारणी मध्ये सर्व धर्म जातीच्या लोकांचा समावेश केलेला आहे. महागाई व बेरोजगारी हुकूमशाही हे सर्व भाजप पक्षामुळे होत आहे. त्यामुळे भाजप हटाव हा नारा आम्ही देत आहोत. असे बाळासाहेब आढाव यांनी सांगितले.
यावेळी कैलास पठारे, रखमाजी जाधव, बाळासाहेब सगळे, शशिकांत गाडी, बबन ढोकणे, संजय भोसले, कमल साळवे, आशा पठारे, दीपक पठारे, वैभव गिरमे, गणेश गुंजाळ, बबनराव खेमनार, संतोष वाघ, अशोक पोटे, अजय आढाव, विकास बोरुडे, बबन खेमनार, अजय तनपुरे, कृणाल पाटील, मुन्नाभाई शेख, पप्पू महाडिक, राजेंद्र जगताप, दादा पाटील आढाव आदिसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
