५० वर्षीय महिलेला पाठीमागून मिठी मारून विनयभंग.
पाणि पिण्याच्या निमित्ताने घरात घुसलेल्या आरोपीने महिलेला मिठी मारून ........
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
पिण्यासाठी पाणि द्या, असे म्हणून ५० वर्षीय महिलेच्या घरात घूसलेल्या आरोपीने महिलेला पाठीमागून मिठी मारली. तसेच महिलेची छाती दाबून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही घटना राहुरी तालूक्यातील गणेगाव येथे दिनांक ११ जून २०२३ रोजी घडलीय.
या घटनेतील आरोपी दिलीप नारायण कोबरणे, रा. गणेगाव, ता. राहुरी. हा दिनांक ११ जून २०२३ रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान पिडीत ५० वर्षीय महिलेच्या घरी पाणी पिण्याच्या निमित्ताने गेला. आरोपीने पाणि मागीतले म्हणून ती महिला पाणी घेण्यासाठी घरात गेली.
तेव्हा आरोपी अनाधिकृतपणे महिलेच्या घरात घुसला. त्या महिलेस पाठीमागून मिठी मारली. आणि तिची छाती दाबून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घटनेनंतर सदर ५० वर्षीय महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
तीच्या फिर्यादीवरून आरोपी दिलीप नारायण कोबरणे, रा. गणेगाव, ता. राहुरी. याच्या विरोधात गून्हा रजि. नं. ६३८/२०२३ भादंवि कलम ३५४, ४५२ प्रमाणे जबरदस्ती घरात घुसून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निकम हे करीत आहेत.
