न्यायालयाची स्टे ऑर्डर असताना देखील रस्ता करण्याचे काम सुरू केले.
१२ जणांकडून तिघांना लाथा बूक्क्यांनी, लोखंडी पाईप व कुऱ्हाडीने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
न्यायालयाची स्टे ऑर्डर असताना देखील रस्ता करण्याचे काम सुरू केले. त्या रस्ता कामाला विरोध केला असता आरोपींनी नवनाथ विटनोर तसेच त्यांची आई व भाऊ यांना लाथा बूक्क्यांनी, लोखंडी पाईप व कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना दिनांक १० जून २०२३ रोजी राहुरी तालूक्यातील मांजरी येथे घडलीय.
नवनाथ बाप्पु विटनोर, वय ३१ वर्षे, हे राहुरी तालूक्यातील मांजरी येथे राहत आहेत. त्यांच्या शेजारी आण्णासाहेब भागवत विटनोर, अशोक भागवत विटनोर, रावसाहेब भागवत विटनोर हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. ते वहीवाटाचे कारणावरुन ते नवनाथ विटनोर यांच्याशी नेहमी वाद घालतात. सदर वहिवाटीचा वाद न्यायालयात सुरू आहे.
न्यायालयाची स्टे ऑर्डर असताना देखील दि. १० जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नवनाथ विटनोर यांच्या शेत गट नं. ६२५ येथे आरोपी आले आणि रस्ता करत होते. तेव्हा नवनाथ विटनोर, त्यांचा भाऊ ज्ञानदीप व आई आसराबाई हे त्यांना समजावुन सांगत होतो की, रस्त्याचा वाद न्यायालयात चालु आहे. तुम्ही येथुन रस्ता करु नका. न्यायालयाचा निकाल लागल्या नंतर तुम्ही रस्ता करा.
तेव्हा आरोपी म्हणाले कि, आम्ही न्यायालयाला मानत नाही, आम्ही येथुनच रस्ता करणार आहे. असे म्हणून आरोपींनी नवनाथ विटनोर त्यांचा भाऊ व आई यांना लाथा बूक्क्यांनी, लोखंडी पाईप व कुऱ्हाडीने मारहाण केली. तसेच परत आम्हाला आडवे आलात तर येथेच गाडुन टाकु. अशी जिवे मारण्याची धमकी दिली व शिवीगाळ करून ते तेथुन निघुन गेले. या घटनेत आसराबाई यांच्या गळ्यातील डोरले गहाळ झाले आहे.
नवनाथ बाप्पु विटनोर यांच्या फिर्यादीवरून २) आण्णासाहेब भागवत विटनोर २) अमोल आण्णासाहेब विटनोर ३) अशोक भागवत विटनोर ४) आप्पासाहेब रावसाहेब विटनोर ५) बाबासाहेब रावसाहेब विटनोर ६) पोपट अशोक विटनोर ७) रावसाहेब भागवत विटनोर ८) संतोष अशोक विटनोर ९) मैनाबाई आण्णासाहेब विटनोर १०) निखील बाबासाहेब विटनोर ११) रंजना आप्पासाहेब विटनोर १२) लताबाई बाबासाहेब विटनोर सर्व रा. मांजरी ता. राहुरी.
या १२ जणांवर गुन्हा रजि. नं. ६४०/२०२३ भादंवि कलम ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
