तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरातील जुन्या बस स्थानका नजीक असलेल्या बालाजी मंदिरा शेजारी भाडोत्री रहिवासी असलेला व मूळचा श्रीरामपूर येथील जगदीश जनवेजा, वय ४६ वर्षे या तरुणाने कुठल्यातरी नैराश्यातून आत्महत्या केली असून त्याच्या आत्महत्येचे गुड अजून उकलले नाही.
राहुरी शहरातील कानिफनाथ चौकातील बालाजी मंदिर परिसरात भाडोत्री म्हणून राहत असलेला जगदीश जनवेजा हा तरुण घरात कोणी नसल्याची संधी साधून घराच्या छताला गळफास घेऊन स्वतःची जीवन यात्रा संपवली आहे. रविवारी दिनांक ११ जून रोजी ही घटना घडली आहे.
दुपारचे वेळी पत्नी कामाला गेली असताना मुलगी आणि वडील हे दोघेच घरात होते. त्यावेळी त्याने मुलीला सांगितले की, तुझ्या आईला कामावरून बोलावून आण मुलगी आईला बोलाविण्यास गेली. तेव्हा घरात कोणी नसल्याची संधी साधून जगदीश यांनी घराचा दरवाजा लावून घेत गळफास लावून आत्महत्या केली आहे.
त्यानंतर पत्नी घरी आली असता हा सर्व प्रकार समोर आला. याबाबत राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या तरुणाने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली. याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
