शिवांकुर ग्रुपच्या सर्व विद्यालयात नवगतांचे स्वागत.....
शिवांकुर विद्यालय मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले
शिक्षण हा समाज विकासाचा पाया आहे समाजातील प्रत्येक घटकांनी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी केले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन पुस्तकाचे वाटप करण्यात आले. राहुरी शहरांमध्ये नव्यानेच सुरू झालेल्या शिवांकुर ग्रुपच्या, शिव प्रतिष्ठान संचलित शिवांकुर रेन्बो स्कूल राहुरी या ठिकाणी नव्याने दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच शिवसृष्टी विद्यालय खडांबे या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता तारडे व आभार रोहिणी भाकरे यांनी केले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापिका छाया जाधव मॅडम, पर्यवेक्षक अरुण खिलारी सर, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रासने मॅडम, ढोकणे मॅडम रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, पल्लवी भालदंड व लिपिक श्री अमोल गाडे, पाळंदे शिपाई शारदा तमनर, शितल म्हसे, सिद्धेश्वर भोईटे,आदींसह बहुसंख्य पालक उपस्थित होते.

