बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधुन कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर.
बालकामगार दिसला की लगेच हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा- न्यायाधीश सौ. बिडकर.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी येथील न्यायालयात राहुरी तालुका वकील संघ व विधी सेवा समिती यांचे संयुक्त विद्यमाने बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधुन कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर प्रभारी मुख्य न्यायाधीश सौ. पूनम बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती च्या अध्यक्षा तथा राहुरी न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश सौ. पूनम बिडकर या होत्या. कार्यक्रमास प्रमुख उपस्थित राहुरी तालुका वकील संधाचे अध्यक्ष ॲड. ऋषिकेश मोरे, उपाध्यक्ष ॲड. मच्छिंद्र देशमुख, सचिव ॲड. संदीप खपके, सरकारी वकील ॲड. नितीन वाघ, ॲड. रवींद्र गागरे हे होते.
बालकामगार विरोधी कायदा या विषयावर ॲड. सूरज बिहानी, ॲड. नितीन वाघ, ॲड. शोभा रणवरे, ॲड. पल्लवी कांबळे यांनी माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. पूनम बिडकर यांनी समाजामध्ये आपण वावरत असतांना आपण जागरूक राहणे गरजेचे आहे. बालकामगार दिसला की लगेच हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.
आपल्या या कृतीने एखाद्या बालकांचे आयुष्य बदलून तो उद्याचा सुजाण नागरिक होऊन चांगले शिक्षण घेऊन करियर घडू शकतो. कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्या मागचा मुख्य उद्देश चांगला संवाद साधून समाजातील तळा गाळातील लोकांपर्यंत चागला संदेश जाऊन त्यांना त्याचा फायदा होतो. असे सांगून वक्त्यांनी चांगली माहिती दिली. म्हणून त्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिव ॲड. संदीप खपके यांनी केले. शेवटी राहुरी तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. मच्छिंद्र देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास उपस्थित ॲड. संजय वने, ॲड. संजय कदम, ॲड. अजय पगारे, ॲड. नानासाहेब निमसे, ॲड. प्रसाद सांगळे, ॲड. संतोष साळुंके, ॲड. गोरख रसाळ,
ॲड. गणेश तोडमल, ॲड. अनिता तोडमल, ॲड. कल्याणी पागिरे, ॲड. स्वाती सांगळे, ॲड. ज्योती राऊत, ॲड. सुरेखा कुलकर्णी, ॲड. अर्चना मैड, ॲड. जयश्री घावटे, ॲड. मनीषा आढाव, ॲड. आसिफ शेख, ॲड. किरण सैनंदोरे, विधी सेवा लीगल विभागाचे विकास जाधव, दत्तात्रेय खेडेकर, कोर्टातील संपूर्ण कर्मचारी स्टाफ सह लाभधारक पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
