राहुरी फॅक्टरी/प्रतिनिधी:-
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सरालाबेट येथील सदगुरु गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे राहुरी फॅक्टरी येथे साई आदर्श मल्टिस्टेटच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी नामाचा गजर करत हजारो वारकरी सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळयात सहभागी झाले असून मोठ्या उत्साहात दिंडी पंढरीकडे मार्गस्थ झाली आहे.आज सकाळी राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टिस्टेटच्या वतीने गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी सरालाबेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे पूजन साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे व संगीता कपाळे यांच्या हस्ते करण्यात आले.तद्नंतर साई आदर्श परिवाराच्या वतीने हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी बोलताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की,पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी आतुरलेला आहे.वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधकांचा समावेश आहे. यंदा पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत आहे. पांडुरंगाच्या चरणी लवकरात लवकर पाऊस व्हावा आणि माझा बळीराजा सुखी व्हावा हीच विनवणी आहे. तसेच नेहमी सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या साई आदर्श मल्टिस्टेटचे शिवाजीराव कपाळे यांनी आज मोठ्या भक्ती भावाने पायी दिंडीचे स्वागत केले. त्यांना पुढील वाटचालीसाठी यश मिळावे असेही महंत रामगिरी महाराज म्हणाले.
यावेळी चंद्रकांत कपाळे,चैताली कपाळे,योगगुरू किशोर थोरात, डॉ. विजय कोते’ रमेश ताकटे,अंजली थोरात,श्वेता व्हिजन,बापूराव वाळुंज, सचीन खडके, सुभाष दुशींग आदिं सह साई आदर्श मल्टिस्टेटचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
प्रसंगी सर्वांचे आभार साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी मानले.
.jpg)