रामदास आठवलेंचे राहुरी 'रिपाइं' तर्फे जोरदार स्वागत
वारस नियुक्ती बाबत राहुरी नगरपरिषद जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा आरोप.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
मंगळवार दिनांक २७/६/२३ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदास आठवले अहमदनगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांसाठी आले होते. अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखेंनी आयोजित केलेल्या सामाजिक अधिकारिता शिबिर या दिव्यांग बंधू-भगिनींच्या कार्यक्रमात रामदास आठवले प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खासदार सदाशिव लोखंडे देखिल उपस्थित होते.
लोणीचा कार्यक्रम आटोपून आठवले नगरला जात असताना रिपाइंचे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी राहुरी बस स्थानका जवळ नगर-मनमाड रोडवर रिपाइं च्या कार्यालयात त्यांचे स्वागत व सत्कार केला.
याप्रसंगी राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी राहुरी शहरातील अनेक प्रश्न आठवले यांच्या समोर मांडले. त्यात राहुरी नगरपालिकेमध्ये अनुसूचित जातीच्या वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्या संदर्भात जाणीवपूर्वक होत असलेल्या विलंबास शासन स्तरावर संबंधित वारसा हक्क प्रकरणातील पात्र लाभार्थी यांची प्रकरणे जाणून-बुजून केली जात नाहीत.
आकृतीबंधा नुसार लोकसंख्येच्या वाढीव मंजुरीसाठी प्रस्ताव जाणीवपूर्वक पाठविला जात नाही. शासन परिपत्रक सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाने 24 फेब्रुवारी 2023 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करून वारसा पात्र लाभार्थी यांना तात्काळ सेवेत समाविष्ट करावे. 30 दिवसाच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी. अशा प्रकारचे निर्देश दिलेले असतानाही केवळ मागासवर्गीयांची प्रकरणी असल्यामुळे प्रशासन प्रशासकीय स्तरावर सूडबुद्धीने काम नगरपरिषद प्रशासनाकडून केले जात आहे.
त्यामुळे केंद्रीय मंत्री आठवले यांनी या संदर्भात लक्ष द्यावे. अशा प्रकारची विनंती करण्यात आली. तालुक्यातील अनेक प्रश्न, जिल्ह्यातील समस्या, पक्षाचे कार्य, शहरातील प्रश्न, येणाऱ्या निवडणूका या संदर्भात चर्चा केली व निवेदन दिले. या संदर्भात आपण लवकरच लक्ष घालू असे आश्वासन आठवले यांनी तालुकाध्यक्ष विलास साळवे यांना दिले.
याप्रसंगी रिपाइं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका उपाध्यक्ष सुनिल चांदणे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रविण लोखंडे, उत्तर महाराष्ट्र संघटक गोविंद दिवे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत सगळगीळे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा स्नेहल सांगळे, तालुक्यातील महिला पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्या, रवि पलघडमल, सुरेन्द्र सांगळे, राजू बागुल, किरण साळवे, मा. सरपंच दिवे तसेच बारागाव नांदूर, राहुरी कारखाना, वडनेर, राहुरी खुर्द, राहुरी स्टेशन, मल्हारवाडी, वांबोरी, देवळाली, टाकळीमीया, राहुरी विद्यापीठ, मुळानगर, कात्रज, करजगाव येथील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
