Type Here to Get Search Results !

राहुरी - ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीच्या पहिल्या बॅचचा शंभर टक्के निकाल.








ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीच्या पहिल्या बॅचचा शंभर टक्के  निकाल.


 राहुरी शहरातील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता 10 वी पहिल्या बॅच च्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मार्च 2023 मध्ये एसएससी बोर्ड परीक्षेत स्कूलचे एकूण 15 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी  12 विद्यार्थी विशेष श्रेणीत 70% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. एक विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर दोन द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. स्कूलमध्ये प्रथम क्रमांक आकांक्षा भारत ढोकणे 89%द्वितीय शुभम कैलास खंडागळे 88% तृतीय कार्तिक सतीश 85% ढोकणे कृष्णा बाबासाहेब 83% ढोकणे साई बाबासाहेब ढोकणे 82% उबेद सलीम पठाण 81%गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. 



 स्कूलचा शंभर टक्के निकाल लावण्यासाठी  शाळेच्या मुख्याध्यापिका प्राध्यापिका  सारिका ढोकणे, प्राध्यापक भगत सर ,साधना शिरसाठ, शुभांगी नवाळे, सीमा पवार, आदींनी परिश्रम घेतले संस्थेचे कार्यकारी विश्वस्त प्रा. डॉ. रामकिसन ढोकणे सर संस्थेचे सर्व विश्वस्त, शाळेचा शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी गुणवंत  विद्यार्थ्यांचे कौतुक केले  व पुढील वाट वाटचालीस शुभेच्छा  दिल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण व त्याचबरोबर संस्कार व शिस्तप्रिय विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशाने 2011 मध्ये ग्लोबल किड्स या प्री प्राइमरी स्कूल ची सुरुवात झाली होती आज 2023 मध्ये उत्तमातील उत्तम देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या  ग्लोबल स्कूलचा शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष ग्लोबल ज्युनिअर कॉलेजच्या रूपान विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची  छाया देत आहे.